Satish Wagh Murder Case Pune : सतीश वाघ खून प्रकरणाचं धक्कादायक सत्य उघडकीस,पत्नीच निघाली मास्टर माईंड, मोहिनी वाघ हिला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Satish Wagh Murder Case Pune : भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी पुण्यात घडली होती. या खुन प्रकरणाचा उलगडा करण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आलं आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीने (Mohini Wagh) आरोपींना पाच लाख रूपयांची सुपारी देण्याची तयारी दाखवून त्यांचा खून घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे.

satish wagh murder case pune, Shocking truth of satish wagh murder case came out, wife turned out to be the mastermind, Mohini Wagh was arrested by Pune police

सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ (Mohini Satish Wagh Pune) हिने संपत्तीच्या तसेच अनैतिक संबंधांच्या संशयातून खून घडवून आणल्याचं पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी तिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहिनी सतीश वाघ (वय 53, रा. फुरसुंगी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. आतिश जाधव, पवन श्यामकुमार शर्मा (वय 30, रा. शांतीनगर, धुळे), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय 32, रा. अनुसया पार्क, वाघोली), अक्षय हरीश जावळकर, विकास शिंदे यापूर्वी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Satish Wagh Murder Case)

सतीश तात्याबा वाघ यांच्याकडे आरोपी अक्षय हरीश जावळकर हा सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहत होता.त्यावेळी मोहिनी सोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. यासंबधीची कुणकुण सतीश वाघ यांना लागल्यामुळे त्यांच्या पत्नीकडूनच खुनाची सुपारी देऊन नवऱ्याचा काटा काढण्याचा डाव आखला. मोहिनी वाघने अक्षयला नवरा सतीश यांचा खून करण्यास सांगितले. त्यासाठी पाच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. त्यापैकी दीड लाख रुपये तिने अक्षयकडे दिले होते. त्यानंतर अक्षयने चार महिन्यांपूर्वी सतीश यांना मारण्यासाठी पवनला सुपारी दिली होती. त्यानंतर पवनने त्याचा साथीदार नवनाथ आणि विकासला आपल्यासोबत सहभागी करून घेतले.अक्षयने आरोपींना दीड लाखाची रक्कम दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

सतीश वाघ हे 9 डिसेंबरला सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकवा गेले असताना पाच जणांनी त्यांचे अपहरण करून अवघ्या 15 मिनिटांमध्ये गाडीतच वाघ यांच्यावर 72 वेळा वार करून त्यांचा निर्घृण खून केला. तासाभरात या सर्व गोष्टी घडल्या त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून दिला. गुन्हे शाखेने त्यांचं अपहरण झालेल्या ठिकाणाहून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना अटक केली.पोलिसांना सतीश वाघ यांच्या पत्नीचा गुन्ह्यात सहभाग असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचले, तिला आता पोलिसांनी अटक केली आहे. (Satish Wagh Murder Case)

जे आर्थिक व्यवहार सतीश वाघ पाहत होते, ते सर्व आर्थिक व्यवहार मोहिनीला तिच्याकडे हवे होते. सतीश वाघ तिला खर्चासाठी पैसे देखील देत नव्हते. यामुळे सुरुवातीला मोहिनीने अक्षयला पती सतीशला गंभीर जखमी करून ते अंथरुणाला खिळून पडतील असे काहीतरी कर, असे सांगितले होतं. त्याचबरोबर मोहिनीने अक्षयला तू जर असं केलं नाही तर आपल्याबद्दल माझ्या नवऱ्याला सांगेन मग तो तुझे काय हाल करेल हे बघ, अशी धमकी दिल्याची माहिती माहिती आहे. यामुळे अक्षय दबावाखाली होता.

त्यानंतर त्याने कट रचत आरोपींशी संगनमताने सतीश वाघ यांचं अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर काही वेळातच सतीश यांचा खून करत पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून दिला. आरोपी अक्षयने पोलिस तपासात मोहिनीनेच खुनाची सुपारी दिल्याचे सांगितले होते. पोलिसांनी याप्रकरणी तिची चौकशी करत, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती मिळवली. मोहिनीचा या कटातील सहभाग स्पष्ट होताच (काल) बुधवारी दुपारी पोलिसांनी तिला अटक केली आहे.

पुण्यात विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाली होती. या हत्येमुळे पुण्यात खळबळ उडाली होती. पण पुणे पोलिसांनी अवघ्या १६ दिवसांमध्ये या प्रकरणाचा छडा लावला आहे. सतीश वाघ यांच्या बायकोच खरी सुत्रधार निघाली आहे. मोहिनी वाघ हिने अनैतिक संबंधातून ५ लाखांची सुपारी देऊन सतीश वाघ यांना संपवलं. यासाठी शेजारी राहणारा मुख्य आरोपी जावळकर याला वाघ यांचं अपहरण आणि हत्येची जबाबदारी सोपवली होती.

कसं झालं अपहरण?

९ डिसेंबरच्या पहाटे शेवाळवाडीत सतीश वाघ हे मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते. घरापासून काही अंतरावर जाताच दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांना जबरदस्तीने एका चार चाकी गाडीत बसवलं आणि अपहरण करून घेऊन गेले. अपहरणानंतर हडपसर पोलिसांनी तत्काळ प्रत्यक्षदर्शीच्या माहितीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

साधारण साडे आठ वाजता हा तपास सुरू झाला होता, अशी माहिती मिळाली. गुन्हे शाखेला सकाळी ९ वाजता टीम रवाना करण्याचे आदेश देण्यात आले होते. साडेनऊ वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या १२ टीमने प्रत्यक्षात शोधाशोध सुरू केली. त्यानंतर सीसीटीव्ही आणि टॉवर लोकेशनच्या मदतीने तपास सुरू १२ वाजता झाला. त्यानंतर तीन वाजेच्या सुमारास पोलीस आयुक्त स्वतः हडपसर पोलिस ठाण्यात दाखल झाले होते.

सतीश वाघ यांना ७२ वेळा भोसकलं आणि प्रायव्हेट पार्ट कापला

शोध सुरू असताना सहा वाजेच्या सुमारास उरूळी कांचनच्या घाटात बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. हडपसर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलिस मृतदेह सापडलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर आठ वाजेच्या सुमारास आयकार आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी रवाना झाली. घटनास्थळी रक्ताने माखलेला लाकडी दांडा आढळला होता. सतीश वाघ यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. ७२ वेळा त्यांना चाकूने भोसकलं होतं. एवढंच नाहीतर मारेकऱ्यांनी वाघ यांचा प्रायव्हेट पार्ट सुद्धा कापण्यात आला होता. अनैतिक संबंधाच्या कारणातून ही हत्या झाली असल्याचं समोर आलं आहे.

या प्रकरणात आतापर्यंत कुणा-कुणाला अटक?

सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांना २५ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली.पवनकुमार शर्मा, विकास शिंदे आणि अक्षय जवळकर या तिघांना पुणे पोलिसांनी आधीच अटक केली होती. धाराशिवमधून २४ डिसेंबरला अतिश जाधवला अटक केली होती. त्यानंतर प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. अक्षय जवळकर हा सतीश वाघ यांचा शेजारीच आहे. मोहिनी वाघ यांनीच अक्षय जवळकरला ५ लाखांची सुपारी दिली होती.

सतीश वाघ खुन प्रकरणाचा घटनाक्रम

  • ९ डिसेंबर रोजी पहाटे ६.३० वाजता सतीश वाघ यांचं अपहरण
  • प्रत्यक्षदर्शीने ७ च्या सुमारास कुटुंबियांना दिली घटनेची माहिती
  • नातेवाईक , स्थानिक यांना सगळ्यांना माहिती कळविण्यात आली.
  • ७.३० वाजता घटनेची माहिती हडपसर पोलिसांना कळवली
  • ८.३० वाजता हडपसर पोलिसांनी तात्काळ प्रत्यक्षदर्शीच्या माहितीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला
  • गुन्हे शाखेला ९ वाजता टीम रवाना करण्याचे आदेश
  • ९.३० वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या १२ टीम्स ने प्रत्यक्षात शोधाशोध सुरू केली.
  • १२ वाजता सीसीटीव्ही आणि टॉवर लोकेशनच्या मदतीने तपास सुरू
  • ३ वाजेच्या सुमारास पोलीस आयुक्त स्वतः हडपसर पोलीस ठाण्यात दाखल
  • शोध सुरू असताना संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास उरूळी कांचनच्या घाटात बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती
  • – हडपसर पोलीस, गुन्हे शाखेचे पोलीस मृतदेह सापडलेल्या ठिकाणी पोहोचले.
  • रात्री ८ वाजेच्या सुमारास फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल, मृतदेह घेतला ताब्यात
  • ११ डिसेंबर – पोलिसांनी ८ ते १० संशयित आरोपींना घेतलं ताब्यात
  • २४ डिसेंबर – धाराशिवमधून संशयित आरोपी असलेल्या शेजाऱ्याला अटक
  • २५ डिसेंबर – सतीश वाघ यांची बायको मोहिनी वाघ यांनीच सुपारी देऊन हत्या केल्याचं उघड