जामखेड टाइम्स वृत्तसेवा : गावातील तंटे गावातच मिटवण्यासाठी राष्ट्रवादीचे (NCP) दिवंगत नेते आर आर पाटील (R R Patil) यांनी गृहमंत्री (Home minister) असताना राज्यात राबवलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना (Mahatma Gandhi Tantamukt Gav Yojana) पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (Home minister Dilip Walse Patil)
गृहमंत्री आर आर पाटील यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या महात्मा तंटामुक्त गाव मोहिमेला राज्यात जोरदार प्रतिसाद मिळाला होता. राज्यातील अनेक गावांनी आपसांतील तंटे मिटवून लाखोंची बक्षिसे पटकावली होती.गाव विकासात याचा मोठा फायदा झाला. या योजनेमुळे गावातील तंटे गावातच मिटत असल्याने पोलिस यंत्रणेवरील ताण हलका झाला होता. लोकसहभागातून ही योजना यशस्वी झाली होती.
2008 साली महात्मा गांधी तंटामुक्त गाव सुरू झाली होती, या मोहिमेमुुळे राज्यात सामाजिक सलोख्याचे चांगले वातावरण निर्माण झाले होते. परंतू काही वर्षानंतर ही योजना बंद पडली. पुन्हा गावा गावातील तंटे वाढू लागले. तंटामुक्त गाव समित्या नुसत्या नावाला उरल्या. काही गावातील तंटामुक्तीचे अध्यक्षच गावात काड्या करायचे काम करू लागले. गावा गावातील तंटे वाढले.
परंतू, आता पुन्हा एकदा महात्मा गांधी तंटामुक्त गाव ही योजना राज्यात सुरू केली जाणार आहे. या योजनेत अनेक नवे बदल सुचवले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडे बदल सुचवलेली नस्ती मान्यतेसाठी सादर करण्यात आली आहे अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.