ब्रेकिंग – शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख याचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. गणपतराव देशमुख यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सोलापूरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. ते तीन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. पण आज संध्याकाळी त्यांनी वयाच्या 97 वर्षी अखेरचा श्वास घेतला.सोलापूरमधील अश्विनी रुग्णालयात काही दिवसांपूर्वी त्यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया पार पडली होती. मात्र तेव्हापासूनचं देशमुख यांच्या प्रकृतीत सतत चढ- उतार होत होते. मात्र आज त्यांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 30, 2021
राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 30, 2021
…त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. दुसरे गणपतराव देशमुख आता होणे नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे आप्तस्वकीय आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.
ॐ शान्ति?
(4/4)https://t.co/WhoRjOGXPF— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 30, 2021
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय गणपतराव देशमुख साहेब यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. सलग ११ वेळा ते निवडून आले होते. त्यांच्या निधनामुळं राजकारणातील एका आदर्श आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत.
त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! ?? pic.twitter.com/dyb7B8hX8b— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 30, 2021
गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘आबासाहेब देशमुख यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. राजकारणामध्ये ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं त्यांच्या सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आबासाहेबांची प्रकृती आत्तापर्यंत चांगली होती. पण आज रात्री ९ वाजता आबासाहेबांचं निधन झालं.’
१० ऑगस्ट १९२६ ला त्यांचा जन्म झाला होता. १९६२ ला त्यांनी सांगोल्यातून सर्वात प्रथम निवडणूक लढवली. त्यानंतर पुढे ते ११ वेळा आमदार झाले. सर्वाधिक वेळा आमदार होण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. आबा या नावाने ते सगळ्या महाराष्ट्रात परिचित होते.
गणपतराव देशमुख यांनी राजकीय कारकिर्दीला सुरूवात केल्यापासूनच ते शेतकरी कामगार पक्षातच होते. शरद पवार यांनी जेव्हा पुलोद सरकारचा प्रयोग केला त्यावेळी मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला होता. १९९९ लाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. २०१२ मध्ये विधानसभेतल्या त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारने त्यांचा गौरव केला होता.
विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम.करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडला होता.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवला होता.
२००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून एम.करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातील दुसरे आमदार ठरले होते.अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले होते.
टेंभू, म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोल्याला आणण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्याआधारे सांगोल्याला दुष्काळमुक्त केले. याशिवाय शेतकरी, कष्टकर्यांच्या मुलांसाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. वयाच्या ९४ व्या वर्षातही ते लोकहितासाठी सक्रिय होते. मात्र ल्या महिन्याभरापासून त्यांची प्रकृती खालावत गेली.
आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 30, 2021
एका व्रतस्थ लोकसेवकाचा प्रवास संपला.
ज्येष्ठ नेते, माजी मंत्री भाई गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/NFaU4Vi5tH— Ashok Chavan (@AshokChavanINC) July 30, 2021
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व गणपतराव देशमुख यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. तब्बल ६० वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अत्यंत साधेपणाने वागून जनसेवा केली. विनम्र श्रद्धांजली! pic.twitter.com/bm4jabd2bd
— Subhash Desai (@Subhash_Desai) July 30, 2021
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व गणपतराव देशमुख यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. तब्बल ६० वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अत्यंत साधेपणाने वागून जनसेवा केली. विनम्र श्रद्धांजली! pic.twitter.com/XzlnNynR7o
— Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) July 30, 2021
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व गणपतराव देशमुख यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. तब्बल ६० वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अत्यंत साधेपणाने वागून जनसेवा केली. विनम्र श्रद्धांजली! pic.twitter.com/XzlnNynR7o
— Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) July 30, 2021
https://twitter.com/prajaktdada/status/1421169700113817608?s=20
साधी राहणीमान, उच्च विचार, एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षाच्या निशाणीवर तब्बल अकरावेळा विधानसभेत निवडून येण्याची किमया शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांनी केली होती..
आम्ही एक जेष्ठ नेते गमावला आहे, भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/YLNCkwu6xl— Nana Patole (@NANA_PATOLE) July 30, 2021
एकाच मतदारसंघातून सर्वाधिक सलग ११ वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,माजी मंत्री गणपतराव देशमुख यांच्या दु:खद निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक ज्येष्ठ अभ्यासु व आदर्श व्यक्तिमत्व हरपले.त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. pic.twitter.com/3LjNqLFvHV
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 30, 2021
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे.
(1/4) pic.twitter.com/HjoNgjouPD— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 30, 2021
शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख जी यांचे आज निधन झाले. ही बातमी अत्यंत दुःखदायक आहे. अभ्यासू नेता, अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी अशी त्यांची ओळख होती.
आम्ही सर्वजण देशमुख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/nMF7y0NLeR— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) July 30, 2021
सांगोला मतदारसंघाचे आमदार महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने चार पिढ्यांतील सर्वसामान्य नागरिकांशी नाळ जोडलेले ‘आदर्श लोकप्रतिनिधी’ आणि एक ज्येष्ठ मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेले आहेत.कायमस्वरूपी दुष्काळाच्या सावटाखाली असलेला सांगोल्याचा आज जो काही pic.twitter.com/sqEDvGiDyv
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) July 30, 2021
शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/gwScSQpwMW
— Dr. Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) July 30, 2021
गणपतराव देशमुख यांचे सांगोला येथील अत्यंदर्शन व अत्यंयात्रा
दि ३१/०७/२०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथून अत्यंयात्रा सुरवात
सकाळी १०.०० वाजता निवासस्थानी अत्यंदर्शन
दुपारी १२.०० वाजता सुतगिरणी येथे अत्यंदर्शन व अत्यंविधी