खळबळजनक : बंंदुकीचा धाक दाखवत 3 कोटींची लुट, लातूरमधील सशस्त्र दरोड्याच्या घटनेने महाराष्ट्रात उडाली खळबळ !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी सशस्त्र दरोड्याची मोठी घटना लातुरमधून समोर आली आहे. पिस्टल आणि चाकूचा धाक दाखवत दरोडेखोरांच्या टोळीने तब्बल 3 कोटींची रोकड आणि दागिन्यांची लुट केली आहे. एका मोठ्या व्यापाऱ्याच्या बंगल्यावर सशस्त्र दरोड्याची घटना घडली आहे. या घटनेने लातुर जिल्हा हादरून गेला आहे. ही घटना बुधवारी पहाटे घडली. याबाबत विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, लातुर शहरातील राजकमल अग्रवाल हे मोठे व्यापारी आहेत. त्यांचा कातपुर मार्गावरील कन्हैयानगर – रामचंद्र नगर भागात बंगला आहे. याच बंगल्यावर बुधवारी पहाटे पाच जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा टाकला.
पहाटे तीन ते चारच्या सुमारास दरोडेखोरांनी राजकमल अग्रवाल यांच्या बंगल्यात प्रवेश करत अग्रवाल यांना झोपेतून जागे केले. त्यांच्या गळ्याला चाकू लावला, पिस्टलसह धारदार हत्याराचा धाक दाखविण्यात आला. यावेळी त्यांच्या घरात पत्नी, मुलगा आणि सून असे चार जण हाेते.
दराेडेखाेरांनी अग्रवाल कुटूबियांना धमकावत त्यांच्याकडील माेबाइल काढून घेतले. राजकमल अग्रवाल यांच्याकडून कपाट आणि लाॅकरच्या चाव्या काढून घेत सिनेस्टाईल पद्धतीने दराेडा टाकला. यावेळी एकूण सव्वादाेन काेटींची राेकड आणि ७३ लाखांचे साेने असा जवळपास तीन काेटींचा मुद्देमाल दराेडेखाेरांनी पळविला.
दराेडेखाेरांनी जाताना घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर समजून वायफायचा बाॅक्स नेला. आम्ही बराच वेळ इथे थांबणार आहाेत, असे दराेडेखाेरांनी बजावले. काहीही हालचाल करु नका, आरडाओरडा करु नका, काेणाशीही संपर्क साधू नका, असे धमकावले. हे दराेडेखाेर २५ ते ३० वयाेगटातील असून, ते मराठी भाषा बाेलत हाेते, असे पाेलिसांनी सांगितले.
पहाटे सव्वातीनच्या सुमारास दराेडेखाेरांनी घर साेडताच, अग्रवाल यांनी विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्याशी संपर्क साधला. घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पाेलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यापाठाेपाठ श्वानपथक, ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले.
पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पाेलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी भेट देवून पाहणी केली. दराेड्यात तब्बल तीन काेटींचा मुद्देमाल पळविल्याचे दुपारपर्यंत समाेर आले.
पाच जणांच्या टाेळींने हा सशस्त्र दराेडा अतिशय प्लॅनिंगने, शांत डाेक्याने टाकल्याचे समाेर आले आहे. या बंगल्यावर आणि अग्रवाल यांच्यावर पाळत ठेवूनच हा दराेडा टकला असावा.श्वान पथक घटनास्थळावरच घुटमळाल्याने दराेडेखाेर एखाद्या वाहनातून पसार झाले असावेत, असाही अंदाज पाेलिसांना व्यक्त केला आहे. जिल्ह्यात सर्वात माेठ्या दराेड्याचा तातडीने तपास करण्याचे मोठे आव्हान पाेलिसांसमाेर आहे.