Shaktipeeth Mahamarg New Update : 805 किलोमीटर लांबीच्या नागपुर – गोवा शक्तिपीठ महामार्गाबाबत समोर आली सर्वात मोठी अपडेट ! 11 जिल्ह्यातील 8200 हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

Nagpur Goa Shaktipeeth Mahamarg new Update : राज्यातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांवरील वाहतुक कोंडी कमी करण्याबरोबरच वाहतुक जलदगतीने व्हावी याकरिता महाराष्ट्र (maharashtra) सरकारकडून वेगाने उपाययोजना राबवल्या जात आहेत. नागपुर ते मुंबई (Nagpur Mumbai) या दरम्यान समृद्धी महामार्ग (samruddhi mahamarg) बांधल्यानंतर सरकारने विदर्भाला आणि पश्चिम महाराष्ट्रासह पुढे गोव्याला जोडण्यासाठी नागपुर गोवा (Nagpur Goa) शक्तिपीठ (Shaktipeeth Mahamarg) हा नवा महामार्ग उभारण्याचे ठरवले आहे. या मार्गाला कोल्हापूर जिल्ह्यात विरोध होत आहे.परंतू आता कोल्हापूर वगळून इतर ११ जिल्ह्यातील भूसंपादन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. (Shaktipeeth Mahamarg latest update today)

Shaktipeeth Mahamarg New Update, biggest update about 805 km long Nagpur-Goa Shaktipeeth highway, 8200 hectares of land in 11 districts will be acquired, Shaktipeeth expressway news,

शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुर जिल्हातून मोठा विरोध झाला होता. नागपुर ते गोवा या ८०५ किलोमीटर अंतराचा हा शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Mahamarg Nagpur Goa) उभारला जाणार आहे. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे.या महामार्गामुळे नागपुर ते गोवा हे अंतर अवघ्या १० तासांवर येणार आहे. नागपुर गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी थांबवण्यात आलेली भूसंपादन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.येत्या आठवडाभरात या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात होणार आहे. कोल्हापूर वगळता इतर ११ जिल्हात भूसंपादन प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.(Shaktipeeth highway latest news)

नागपुर ते मुंबई या समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपुर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा महामार्ग प्रमुख देवस्थानांना जोडणारा आहे. या महामार्गासाठी तब्बल ८६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग नागपुर, वर्धा, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापुर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून गावाला जाणार आहे. एमएसआरडीसीने (MSRDC) हा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी २०२४ मध्ये भूसंपादन प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. (Shaktipeeth Mahamarg latest news)

सदर प्रकल्पाच्या उभारणीसाठी पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अभ्यास करण्यासाठी पर्यावरण परवानगीचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयासह राज्य सरकारकडे पाठविला होता. परंतू या प्रकल्पाला कोल्हापुर आणि सांगली जिल्ह्यात तीव्र विरोध झाला होता.त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया थांबवण्यात आली होती. (Shaktipeeth Mahamarg new Update today)

राज्य सरकारच्या आदेशानुसार एमएसआरडीसीने हा प्रस्ताव मागे घेतला होता. सरकारने सप्टेंबर २०२४ मध्ये भूसंपादनाची अधिसूचना रद्द केली होती. पण आता मात्र राज्य सरकारनेच हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याचेही आदेश दिले आहेत. या आदेशानुसार एमएसआरडीसी कामाला लागली आहे. (Shaktipeeth expressway news)

८०५ किमीच्या या महामार्गासाठी १२ जिल्ह्यांतील ९३०० हेक्टर जागा संपादित करावी लागणार. त्यासाठी १२ हजार कोटी रुपयांची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र ९३०० हेक्टरऐवजी ८२०० हेक्टर जागेचे संपादन केले जाणार. कोल्हापूरमध्ये महामार्गाला विरोध आहे. त्यामुळे तेथील ११०० हेक्टर भूसंपादन वगळत ११ जिल्ह्यांतील एकूण ८२०० हेक्टर जागेचे संपादन केले जाणार आहे. (Shaktipeeth Mahamarg news in marathi)

भूसंपादन आणि पर्यावरण, वन विभागाशी संबंधित परवानगी तसेच इतर परवानग्या येत्या काही महिन्यांत घेत प्रकल्प पुढे नेण्यास प्राधान्य असणार आहे.भूसंपादनाची प्रक्रिया बऱ्यापैकी पूर्ण झाल्यानंतर बांधकामासाठी कंत्राट काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. (Shaktipeeth Mahamarg maharashtra)

सरकारच्या आदेशानंतर तात्काळ एमएसआरडीसीने पर्यावरण परवानगीसंबंधीचा प्रस्ताव १० जानेवारीला केंद्र आणि राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. आता त्यापुढे जात या प्रकल्पासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेला पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आठवड्याभरात भूसंपादनास सुरुवात होईल. – अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी