जामखेड टाईम्स वृत्तसेवा : शहरातील नामांकित पत्रकार शशीकांत देशमुख यांची दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी या प्रसिध्द शैक्षणिक संस्थेच्या सेक्रेटरीपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. संस्थेचे सेक्रेटरी मोरेश्वर देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर शशीकांत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Shashikant Deshmukh elected as Secretary of The People’s Education Society)
शशिकांत देशमुख हे दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेसोबत गेल्या वीस वर्षांपासून निगडीत आहेत. यापुर्वी त्यांनी संस्थेच्या पाँलिटेक्निक काँलेजचे अधिक्षक म्हणूनही अनेक वर्ष काम पाहिलेले आहे. तसेच जामखेड येथील लोकमान्य तालुका वाचनालयावर संचालक म्हणून ते कार्यरत आहेत.
शशीकांत देशमुख यांनी सतरा वर्षे जामखेडच्या पत्रकारितेत आपल्या लेखणीचा वेगळाच ठसा उमटवला आहे. अभ्यासु पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. या काळात त्यांनी सकाळ, लोकमत, फुलोरा, काँलेज कट्टा, जामखेड समाचार आदी वृत्तपत्रासाठी पत्रकार व संपादक म्हणून काम केले आहे. शहरातील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक संस्थांशी देशमुख हे निगडित आहेत.