Sai Sansthan Election Results : विखे पिता-पुत्राच्या पॅनलचा सुपडा साफ, विवेक कोल्हेंच्या राजकीय खेळीने विखे गटाची बत्ती गुल !

Sai Sansthan Election Results : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना त्याच्याच होमपिचवर मोठा राजकीय धक्का बसला आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या (Sai Sansthan) कर्मचारी सोसायटी निवडणूकीत विखे यांच्या दोन्ही गटाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या निवडणुकीत भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) याच्या गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले.कर्मचारी सोसायटीवर विखे गटाची 20 वर्षांपासून असलेली सत्ता खालसा झाली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विखे गटावर साईबाबा रूसल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे.

Shirdi latest news today, Saibaba Sansthan Employee Society Election Results, Vikhe Father and Sons Panel Cleared, Vivek Kolhe's Political moves Vikhe Group's Batti Gul,

शिर्डीच्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीची आज 11 रोजी निवडणूक पार पडली. 17 जागांसाठी 53 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत विखे पिता- पुत्रांनी स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरवले होते. तर कामगार नेते विठ्ठल पवार यांनी स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरवला होता. पवार यांच्या पॅनलला कोल्हे गटाने ताकद दिली होती. तिरंगी लढतीत कोण जिंकणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या.

सोसायटीच्या निवडणुकीसाठी 11 रोजी मतदान पार पडले. 97 % मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर लगेच मतमोजणी पार पडली. यात विखे पिता- पुत्रांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला. कामगार नेते  विठ्ठल पवार यांच्या पॅनलने सर्व 17 जागा जिंकत इतिहास घडवला. तिरंगी लढतीत विखे पिता पुत्रांच्पा पॅनलचा सुफडा साफ झाला. या निवडणुकीत विवेक कोल्हेंनी  विठ्ठल पवार यांच्या पॅनलला राजकीय ताकद देत विखेंना त्यांच्याच होमपिचवर धोबीपछाड दिला.

Shirdi latest news today, Saibaba Sansthan Employee Society Election Results, Vikhe Father and Sons Panel Cleared, Vivek Kolhe's Political moves Vikhe Group's Batti Gul,

या सोसायटीत 1 हजार 666 सभासद आणि साईबाबा सोसायटीचे 200 कर्मचारी संख्या असलेल्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीची वार्षिक उलाढाल जवळपास दीडशे कोटी रूपये आहे. तर वार्षिक नफा चार कोटी रुपयांपर्यंत असून 75 कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. कोट्यावधी रूपयांची उलाढाल असलेल्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी साई हनुमान पॅनल तर खासदार सुजय विखेंनी साई जनसेवा पॅनल तर कामगार नेते विठ्ठल पवार यांनी परिवर्तन पॅनल निवडणूकीच्या रिंगणात उतरवला होता. पवार यांच्या पॅनलला घेण्यासाठी अनेक खेळ्या खेळण्यात आल्या पण पवारांना कोल्हेची साथ मिळाल्याने विखे गटाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शिर्डीतील या निकालाची चर्चा राज्यभरात रंगली आहे.

Sai Sansthan Election Results : साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार

महादू बाप कांदळकर, कृष्णा नाथा आरणे, भाऊसाहेब चांगदेव कोकाटे, संभाजी शिवाजी तुरकने, देविदास विश्वनाथ जगताप, पोपट भास्कर कोते, विनोद गोवर्धन कोते, मिलिंद यशवंत दुनबळे, तुळशीराम रावसाहेब पवार, रवींद्र बाबू गायकवाड, भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे,इकबाल फकीर महंमद तांबोळी, गणेश अशोक अहिरे, सुनंदा किसन जगताप, लता मधुकर बारसे, विठ्ठल तुकाराम पवार हे विजयी झाले आहेत.

हा दहशतीविरुद्ध उठवलेला आवाजाचा विजय : कोल्हे

“17 शून्यने विठ्ठल पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा दणदणीत विजय झालाय. त्याबद्दल मी सर्व विजय उमेदवारांचे अभिनंदन करतो आणि सर्व सभासदांचे आभार मानतो. हा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा विजय आहे. हा दहशतविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध उठवलेल्या आवाजाचा विजय आहे. हा दडपशाही करून 598 लोकांवर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात उठाव झाल्याचा विजय आहे”, अशी प्रतिक्रिया युवा भाजप नेते विवेक कोल्हे यांनी विजयानंतर दिली आहे.

अदृश्य शक्ती मुळे विजय : विठ्ठल पवार –

“साईबाबांच्या आशीर्वादामुळे आणि साई संस्थानमधील सर्वच कामगारांच्या पाठिंब्यामुळे विजय शक्य झाला. माझ्या मित्रपरिवार आणि ज्ञात अज्ञात अदृश्य शक्तींनी मला साथ दिली. त्यामुळे हा विजय मिळालाय. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करतोय आणि संघर्षाची पावती म्हणून सर्व कामगारांनी आमच्यावर जबाबदारी टाकली. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या देवस्थानची संस्था असल्याने भविष्यात आम्हाला ते पुढे नेण्यासाठी काम करावे लागेल. आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन संस्थेच्या प्रगतीसाठी काम करेल”, अशी प्रतिक्रिया परिवर्तन पॅनलचे नेते विठ्ठल पवार यांनी दिली आहे.

विवेक कोल्हेंची पडद्यामागून सूत्र हलवली –

गणेश सहकारी कारखान्यात काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी एकत्र येत सत्तेचा ताबा घेतला. त्यानंतर साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीत विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलला विवेक कोल्हे यांनी पडद्यामागून बळ दिले. मात्र विजयी मिरवणुकीत जल्लोष करण्यासाठी भाजपचे विवेक कोल्हे थेट मतमोजणी केंद्रावर पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी कोल्हे यांनी कार्यकर्त्यांसोबत आनंद साजरा केला.

राहाता तालुक्यात गणेश सहकारी कारखाना, ग्रामपंचायत निवडणुकीत विखे पिता-पुत्रांच्या गटाला पराभवाचे धक्के बसले आहेत. यानंतर आता शिर्डी देवस्थानच्या सोसायटीत देखील विखे पिता-पुत्र गटाला पराभव पाहावा लागलाय. निडवणुकीत विखे पिता-पुत्रांनी स्वतंत्र पॅनल उतरवल्याने महसूलमंत्री सत्ता राखणार का? याकडे सर्वांच लक्ष लागले होते. मात्र विवेक कोल्हे पुरस्कृत विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने विखे पिता-पुत्र गटाच्या पॅनलला पराभवाची धूळ चारली.