शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण निकाल : एकनाथ शिंदेंना धक्का की उध्दव ठाकरेंना धक्का ? थोड्याच वेळात फैसला
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंड पुकारल्यानंतर निर्माण झालेल्या सत्तासंघर्षात आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या समोर आमदार अपात्रता याचिकांवर तब्बल चार महिने सुनावणी चालली. त्यावर आज निकाल दिला जाणार आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार हा निकाल दिला जाणार आहे. या कायद्याचे नेमके कोणी उल्लंघन केले. कोणी नाही. याचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे. या निकालाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. ठाकरे गटाने शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे, तर शिंदे गटाने ठाकरे गटाच्या 14 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यावर आज राहुल नार्वेकर निर्णय घेणार आहेत. राहूल नार्वेकर हे विधानभवनात दाखल झाले असून त्यांनी निकाल वाचण्यास सुरूवात केली.