जालना : शासकीय नोकरदार लाच स्वरूपात दारूचे खंबे मागत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, 7 हजार रूपयांच्या लाच प्रकरणी दोन ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात !
जालना, 10 जूलै 2023 : जालना जिल्ह्यातील बदनापूर पंचायत समितीत कार्यरत असलेल्या दोघा ग्रामसेवकांना (Badnapur Gramsevak acb raid) 7 हजार रूपयांच्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Jalna ACB Raid)
जालना जिल्ह्यातील बदनापूर पंचायत समितीत (badanapur panchayat samiti) कार्यरत असलेल्या सिद्धार्थ रामकृष्ण घोडके, (Gramsevak Siddharth Ramakrishna Ghodke acb news) ग्रामसेवक, पंचायत समिती बदनापूर (वर्ग-3) व श्रीमती अंबुलगे, ग्रामसेवक उज्जैनपुरी, (Mrs. Ambulge GramSevak Ujjainpuri,) पंचायत समिती बदनापूर (वर्ग-3) या दोघा ग्रामसेवकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. 7 हजार रूपयांची लाच मागण्याबरोबरच 2 ब्लॅकडॉग दारूचे खंबे लाच स्वरूपात मागण्यात आले होते. शासकीय नोकरदार दारूचे खंबे लाच स्वरूपात मागत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मौजे मांजरगाव ता. बदनापूर जि.जालना येथे करण्यात आलेल्या भूमिगत नाली बांधकामाची M. B. व उर्वरीत 1,48,467 रुपयांचा निधी बांधकाम करणारे मजुरांना व बांधकाम साहित्य देणारे दुकानदार यांना अदा करण्याचे परवानगी लेटरवर गट विकास अधिकारी पंचायत समिती बदनापूर यांची सही घेवून देण्यासाठी ग्रामसेवक सिद्धार्थ घोडके यांनी दिनांक 20/06/2023 रोजी तक्रारदार यांना पंचासमक्ष 7000 रू. रूपयांची लाचेची मागणी केली होती.
सदर लाच घेण्यासाठी यातील ग्रामसेविका श्रीमती अंबुलगे यांनी एका लाखाच्या बिलासाठी BDO मॅडम यांना 4,000 रूपये आणि विस्तार अधिकारी यांना 1 ते 2 हजार रूपये द्यावे लागतात, तसेच क्लार्क यांना सुद्धा वेगळे 500 रूपये द्यावे लागतात असे सांगुन तक्रारदार यांना लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले.
त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर सदर गुन्ह्यात सिध्दार्थ घोडके व श्रीमती अंबुलगे या ग्रामसेवकांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेण्याची कारवाई आज 10 रोजी केली. त्यांच्याविरुद्ध बदनापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालनाचे पोलिस उपअधीक्षक किरण बिडवे यांच्या पथकाने पार पाडली. या पथकात पोलीस अंमलदार – शिवाजी जमधडे, गजानन घायवट, कृष्णा देठे, गणेश बुजाडे सह आदींचा समावेश होता.