Ashok Najan Nashik : स्वता:वर गोळी झाडून घेत पोलिस निरीक्षकाने संपवले आयुष्य, पोलिस ठाण्यात घडलेल्या घटनेने उडाली मोठी खळबळ !
Ashok Najan Nashik : महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी एक मोठी घटना नाशिकमधून समोर आली आहे.या घटनेत पोलिस ठाण्यात एका पोलिस अधिकाऱ्यांने स्वता:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. ही घटना नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असलेल्या अंबड पोलिस स्टेशनमधून समोर आली आहे. या घटनेने नाशिक जिल्हा हादरून गेला आहे.
महाराष्ट्रातील नाशिक शहराच्या अंबड पोलिस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक अशोक नजन (PI Ashok Najan) यांनी स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत. (Ashok Najan Nashik)
मिळालेल्या माहितीनुसार, अंबड पोलिस ठाण्यात पोलिस निरिक्षक अशोक नजन (Ashok Najan Police) हे नेहमी प्रमाणे आपल्या केबीनमध्ये सकाळी बसले होते. तेव्हा अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला आणि ठाण्यातील सर्व अधिकारी आणि पोलिस कर्मचारी यांनी अशोक यांच्या कॅबिमध्ये धाव घेतली. अशोक यांनी डोक्यात स्वत:च्या पिस्तूलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याचे दिसून आले. घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस ठाण्यात या घटनेनंतर गोंधळाची परस्थिती निर्माण झाली. पोलिस अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. हि घटना आज सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. (Ashok Najan Nashik)
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी अंबड पोलिस ठाण्यात दाखल झाले असून त्यांच्याकडून या संपूर्ण घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलिसांकडून सुरू असून काल बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्याने अचानक आत्महत्या केल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.(Ashok Najan Nashik)
पोलिस ठाण्यातच पोलिस अधिकाऱ्याने बंदुकी मधून स्वतःवर गोळी झाडून घेतल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
पोलिस अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पोलिस ठाण्याच्या परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली होती. (Ashok Najan Nashik)
या घटनेची माहिती अशोक नजन यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. अशोक नजन (वय 40) यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालायात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.पोलिसांनी पिस्तूल जप्त केली. या घटनेनंतर नाशिक पोलिस दलात शोककळा पसरली. त्यांच्या आत्महत्याचे कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेनंतर अशोक नजन यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Ashok Najan Nashik)