Crime News Today : धक्कादायक, लग्न होत नसल्याने तरूणाने केली जन्मदात्या बापाची हत्या

Crime News Today : समाजात लग्नाळू (अविवाहित) तरूणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्याची कारणे अनेक आहेत. लग्न जमवताना, मुलगी शोधताना लग्नाळू तरूण व त्यांच्या कुटूंबियांची पुरती दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या वयाबरोबर लग्न होत नसल्याने तरूण मुले टोकाचे पाऊल उचलत आहेत.

Shocking, young man killed his biological father as he could not get married, crime news today,

अशीच एक संतापजनक घटना आता उघडकीस आली आहे. या घटनेत लग्न होत नसल्याने एका तरूणाने टोकाचे पाऊल उचलत जन्मदात्या बापाची हत्या (Murder) केली आहे. या घटनेने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. तरूणांचे लग्न होत नसल्याचा मुद्दा किती गंभीर बनत चालला आहे, हेच या घटनेतून अधोरेखित होत आहे. (Crime News Today)

याबाबत सविस्तर असे की, यावल तालुक्यातील पिळोदा या गावातील देवानंद रतन कोळी  (वय २८)  हा तरूण “माझे लग्न करून द्या” अशी मागणी आपल्या कुटुंबाकडे करत होता. पण या विषयाकडे कुटूंबियांकडून दुर्लक्ष होत होते. याच कारणाने संतापलेल्या देवानंद याने जन्मदात्या पित्याची लोखंडी कुर्‍हाडीने वार करत हत्या केली. ही घटना १४ रोजी ११ च्या सुमारास घडली. या घटनेत रतन तानसिंग कोळी वय ७३ यांचा मृत्यू झाला आहे. खुनाच्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.(Crime News Today)

Crime News Today : झोपलेल्या बापाला निर्दयी मुलाने संपवले

वारंवार सांगूनही लग्न करून देत नाहीत किंवा लग्नाला पैसे देत नाहीत या कारणाने संतापलेल्या देवानंद कोळी याने आपले वयोवृद्ध वडिल रतन कोळी हे घरात झोपलेले असताना कुर्‍हाडीने डोक्यात घाव घालत त्यांची हत्या केली. याप्रकरणी देवानंद कोळी याच्याविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी देवानंद विरूध्द त्याची आई शुबाबाई रतन कोळी वय ६० यांनी फिर्याद दाखल केली आहे.(Crime News Today)

दरम्यान घटनेची माहिती मिळताच फैजपुरच्या डीवायएसपी अन्नपूर्णा सिंह यांनी पिळोदा गावात भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर हे करत आहेत. (Crime News Today)