जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात कोरोनाच्या डेल्टा व डेल्टा प्लस व्हेरियंटचे नवे रूग्ण सापडू लागल्याने राज्याच्या चिंता वाढल्या आहेत. राज्यात कोरोनाची तिसरी लाट जर सक्रीय झाली तर ही लाट विनाशकारी असेल अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या लाटेपासुन राज्याचे संरक्षण व्हावे यासाठी सरकारकडून शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा एकदा लावण्याचा निर्णय झाला आहे. येत्या सोमवारपासून लवकरच शटर डाऊन होणार आहे. पुन्हा निर्बंध लागू झाल्याने जनतेची धडधड वाढली आहे. मागील वर्षीपासुन कोरोनाने सर्वच क्षेत्राचे मोठे नुकसान केले आहे. आता नव्याने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शटर डाऊनचा धोका निर्माण झाल्याने जनतेत चिंतेचे वातावरण पसरले आहे. (Shutter down again: public outcry over new restrictions)