जामखेड टाईम्स वृत्तसेवा ( सत्तार शेख) कर्जत जामखेड मतदारसंघातील (Karjat Jamkhed vidhansabha Matdarsangh) शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ संशोधनाची आवड निर्माण व्हावी यादृष्टीने आमदार रोहित पवार ( Mla Rohit Pawar ) यांच्या संकल्पनेतून फिरते तारांगण हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आता मतदारसंघातील गावोगावी अंतराळ अवतरणार आहे. (Space to be launched in villages in Karjat Jamkhed to give a boost to space research)
‘सफर अंतराळाची’ व डिजिटल इंटरॅक्टिव क्लासरुम या दोन प्रकल्पाचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज मुंबईत लोकार्पण करण्यात आले.कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे हे फिरते तारांगण व टेलिस्कोप प्रत्येक शाळेमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या तारांगणमध्ये विद्यार्थ्यांना नेहरू तारांगणाप्रमाणे अवकाशाबद्दल रंजक माहिती तसेच टेलिस्कोपद्वारे प्रत्यक्ष अकाशगंगा, ग्रह-तारे व अंतराळातील इतर गोष्टी बघायला मिळणार आहेत. भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी अंतराळ संशोधन क्षेत्रात आपले करियर घडवण्यासाठी पुढे यावेत याचसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे असे आमदार रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. (Space to be launched in villages in Karjat Jamkhed to give a boost to space research)
शिक्षण क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थी व समाजहित लक्षात घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे त्यासाठी राजकीय दृष्टीकोन न ठेवता विद्यार्थी व शैक्षणिक गुणवत्ता साधली पाहिजे. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी आ.रोहित पवार शैक्षणिक क्रांती करण्याचे काम करत आहेत.असे मत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले. (Space to be launched in villages in Karjat Jamkhed to give a boost to space research)
एकिकडे संसाधने जरी मिळत असली तरी शिक्षकांना डिजीटल साक्षर करण्याची आवश्यकता आहे. कामचुकार शिक्षकांचा भरणा मतदारसंघात अधिक असल्याने गुणवत्तापुर्ण शिक्षणापासुन विद्यार्थी वंचित राहण्याचा अधिक धोका निर्माण झाला आहे याकडे आमदार रोहित पवारांनी अधिक लक्ष घालणे आवश्यक आहे. (Space to be launched in villages in Karjat Jamkhed to give a boost to space research)