SSC 10th Result 2022 । दहावीचा निकाल कधी ?उत्सुकता संपली, या तारखेला जाहीर होऊ शकतो दहावीचा निकाल

Maharashtra SSC 10th Result 2022 Date updates : बारावीचा (12th result 2022) निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा निकाल कधी (10th result 2022 date) लागणार याची उत्सुकता राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना लागली आहे.

महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा मार्च 2022 मध्ये झाली होती, या परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांकडून महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार? याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. बोर्डाने उत्तरपत्रिका तपासण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली आहे. यामुळे पुढील काही दिवसात तांत्रिक बाबी पूर्ण होतील.

लवकरच 10वी च्या निकालासंबंधीची प्रतिक्षा संपणार आहे, कारण राज्यसभा निवडणुकीनंतर कोणत्याही क्षणी दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर होऊ शकतो अशी माहिती समोर आहे.

दहावी निकाल 2022 link

दरम्यान दहवीच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात दहावीचा online निकाल कसा पहायचा हा प्रश्न येत असेल तर ते विद्यार्थ्यी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर दहावीचा ऑनलाइन निकाल पाहू शकणार आहेत. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल.

दहावीचा निकाल १५ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी ऑफिशियल माहितीसाठी मंडळाची वेबसाइट पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड लवकरच यासंदर्भात घोषणा करतील.