ssc result 2021 maharashtra board | दहावी निकालाच्या दोन्ही वेबसाईट डाऊन, विद्यार्थ्यांसह पालक हैरान
जाणुन घ्या यंदाच्या १० वीच्या निकालाची खास वैशिष्ट्ये
पुणे : कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेच्या (Second Wave) प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षा (Maharashtra SSC Exam) होऊ शकल्या नव्हत्या. दहावी विद्यार्थ्यांना पास कसे करायचे यावर राज्य सरकारमध्ये बरेच मंथन झाले होते. सरकार व शिक्षण क्षेत्रातील तज्ञांच्या चर्चेतून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार सरकारने आज दहावीचा ऑनलाईन निकाल (ssc result 2021 maharashtra board) जाहीर केला आहे. (Maharashtra SSC Results announced 2021
Maharashtra SSC Result 2021 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र विद्यार्थ्यांना अडीच वाजून गेल्या तरी अद्याप आपला निकाल पाहता आलेला नाही. दहावीच्या निकाल पाहण्यासाठी दिलेल्या दोन्ही वेबसाईट तब्बल दीड तास उलटूनही अद्याप देखील डाऊनच आहेत.
निकालाच्या वेबसाईट कधी पूर्ववत होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे. वेबसाईट डाऊन का झाल्या याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
विद्यार्थ्यांना आपला निकाल खालील वेबसाईट्सवर पाहता येईल.
mahresult.nic.in
https://result.mh-ssc.ac.in
https://www.mahahsscboard.in
ssc result 2021 maharashtra board | या ऐतिहासिक निकालाची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत? चला तर मग जाणून घेऊयात
ssc result 2021 maharashtra board | या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५७५८०६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५७५७५२ विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी १५७४९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.९५ इतकी आहे. (Maharashtra SSC Results announced 2021)
ssc result 2021 maharashtra board | सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (१००%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९९.८४ %) आहे. (Maharashtra SSC Results announced 2021)
ssc result 2021 maharashtra board | सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थींनींचा (मुलींचा) निकाल ९९.९६ % असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ % आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या (मुलींच्या) निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा ०.०२ % ने जास्त आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९७.८४ % लागला आहे. (Maharashtra SSC Results announced 2021)
ssc result 2021 maharashtra board | एकूण ७२ विषयांना सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीत निश्चित केलेल्या भारांशनुसार गुणदान करण्यात आले असून त्यामध्ये २७ विषयांचा निकाल १०० % टक्के लागला आहे. (Maharashtra SSC Results announced 2021)
राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ६४८६८३ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ६९८८८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २१८०७० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ९३५६ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. (Maharashtra SSC Results announced 2021)
ssc result 2021 maharashtra board | राज्यातील २२७६७ शाळांतून १६५८६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२३८४ शाळांचा निकाल १०० % लागला आहे. (Maharashtra SSC Results announced 2021)
ssc result 2021 maharashtra board | सन २०२१ चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च २०२० च्या निकालाच्या तुलनेत ४.६५ % जास्त आहे. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २८४२४ एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ९७.४५ आहे. (Maharashtra SSC Results announced 2021)
ssc result 2021 maharashtra board | अहमदनगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९.९७ टक्के
ssc result 2021 maharashtra board | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाइन जाहीर झाला. यात नगर जिल्ह्याचा निकाल ९९.९७ टक्के लागला.यंदा कोरोनामुळे ही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार गुण दिले गेले आहेत. त्यामुळे एकही दिवस वर्ग न भरता व परीक्षा न देता लागलेला हा पहिलाच निकाल ठरला आहे. नगर जिल्ह्यातून मार्च २०२१ या वर्षातील परीक्षेसाठी ७० हजार ५८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.