जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कुणावर कुठे अन्याय अत्याचार झाला तर केवळ फिर्याद द्यावी पुढची सर्व जबाबदारी पोलीस पार पाडतील. पोलिसांना केवळ पोलीस कर्मचारी न म्हणता ‘पोलिस अधिकारी’ म्हणुन मान सन्मान दिल्यास पोलिसांकडून त्याची समाजाला चांगल्या कामातून नक्कीच परतफेड होईल असे सांगत सर्वसामान्य जनतेची उत्कृष्ट सेवा करण्याची हमी देतो’ असे मत पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केले. (Superintendent of Police Manoj Patil appealed to the police to respect them as ‘police officers’ instead of calling them police personnel)
आमदार रोहित पवार यांनी सीएसआर फंडातून कर्जत व जामखेड पोलिसांसाठी उपलब्ध करून दिलेल्या अद्ययावत चार पोलिस चेकपोस्टचे आज कर्जतमध्ये जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार रोहित पवार, जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, प्रांताधिकारी अर्चना नष्टे,जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, तहसीलदार नानासाहेब आगळे आदी उपस्थित होते.
सीएसआर फंडातून मतदारसंघासाठी सध्या चार चेकपोस्ट देण्यात आल्या आहेत. आणखी चार लहान अशा एकूण आठ पोलिस चौक्यांचा यामध्ये सामावेश आहे.संबंधित भागासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची असलेली आवश्यकता व त्या भागात असलेले गुन्ह्यांचे प्रमाण आदींच्या आलेखावरून हे चेकपोस्ट ज्या-त्या ठिकाणी पोलिस यंत्रणेकडून स्थानबद्ध करण्यात येणार आहेत.
“मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी माझा कायम प्रयत्न सुरू असतो.पोलिस यंत्रणेला प्रत्येक गावाच्या नजीक आणण्यासाठी माझा प्रयत्न आहे.जेणे करून नागरिकांच्या प्रश्नांची पोलिस बांधवांकडून तात्काळ सोडवणूक होईल. चेकपोस्टच्या माध्यमातून गुन्ह्यांना आळा घालता येईल असे आमदार रोहित पवार म्हणाले.