Swayam Paranjape thane : कोयत्याने 50 वार करत बिल्डर पुत्राची हत्या, आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या स्वयम परांजपेचा खेळ खल्लास !
ठाणे : ४ ऑक्टोबर २०२४ : आक्षेपार्ह फोटो काढून एका तरूणीला सतत ब्लॅकमेल करणे एका बिल्डर पुत्राला चांगलेच भोवले.२० वर्षीय पीडित तरूणीला बिल्डर पुत्राकडून सतत ब्लॅकमेल केले जायचे. याच त्यामुळे तिच्या मित्राने टोकाचे पाऊल उचलले.त्याने बिल्डर पुत्रावर कोयत्याने 50 वार करत त्याचा कायमचाच काटा काढला. स्वयम शैलेश परांजपे (Swayam Paranjape thane) असे मयत बिल्डर पुत्राचे नाव आहे. ठाण्यात भर सकाळी हत्येचा थरार रंगल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
स्वयम परांजपे (वय 33) हा ठाण्यातील एका बिल्डरचा मुलगा आहे. एका तरूणीला ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणात त्याची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी मयुर नंदू धुमाळ (वय २४) व त्या तरूणीला कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Swayam Paranjape News)
मयत स्वयम परांजपे आणि पिडीत तरूणी यांची एका लग्नसमारंभात २० एप्रिल रोजी ओळख झाली होती. त्यावेळी स्वयमने पिडीत तरूणीला त्याच्या कारने घरी सोडतो म्हणून घेऊन गेला. मात्र वाटेत त्याने तिला शितपेयातून गुंगीचे औषध दिले आणि तिला स्वता:च्या घरी घेऊन गेला होता. त्यावेळी त्याने त्या तरूणीचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ काढले होते.
काही दिवसानंतर स्वयम परांजपे याने त्या तरूणीला तिचे काढलेले आक्षेपार्ह फोटो.व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करत होता. स्वयम परांजपे याच्याकडून होत असलेल्या त्रासाबाबत पिडीत तरूणीने सदरची बाब तिचा मित्र मयुर (मयुरेश) धुमाळ याला सांगितला.
बिल्डर पुत्राच्या कारनाम्याने संतापलेल्या मयुरेशने कोपरी येथील अष्टविनायक चौक परिसरातील संचार सोसायटीत राहणाऱ्या स्वयम परांजपेची इमारतीत घुसून कोयत्याने सपासप वार करत हत्या केली. ही घटना आज ४ रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली. या घटनेने ठाण्यात मोठी उडाली आहे.
स्वयम परांजपे याची हत्या झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी मयुरेश धुमाळ याला ताब्यात घेतले आहे. मयुरेश याने स्वयमची हत्या का केली, खरेच तरुणीला ब्लॅकमेल केल्याच्या रागातून ही हत्या झाली आहे का, की या हत्येमागे आणखी काही कारण आहे याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत शिंदे यांनी दिली.
प्रेम प्रकरणातून हत्या ?
मयत स्वयम परांजपे व एका तरूणीचे प्रेम प्रकरण होते. त्या तरूणीचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी स्वयम हा आपल्या प्रियसीला द्यायचा, तिला यावरून तो सतत ब्लॅकमेल करायचा. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ती तरूणी व तिचा नवा प्रियकर मयुर नंदू धुमाळ हे दोघे स्वयमच्या घरी गेले. यावेळी मयुर ने कोयता व कटरने स्वयम वर सपासप वार करत त्याची हत्या केली. या हल्लात स्वयमवर ५० वार करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
धक्कादायक म्हणजे स्वयमची हत्या केल्यानंतर मयुर व ती तरूणी इमारतीखाली निवांत बसले होते. यावेळी मयुर हा सिगारेटचे झुरके मारत बसला होता. दोघेही पोलिस येण्याची वाट पाहत बसले होते. पोलिस आल्यावर दोघे जण स्वता:हून पोलिसांच्या स्वाधीन झाले. आरोपी मयुर हा जांभळी नाका तर त्याची प्रेयसी चेंदणी कोळीवाडा येथे राहत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
गुरूवारी लावली फिल्डींग पण शुक्रवारी वाजवला गेम
युवतीने तिच्यासोबत घडलेला प्रकार मयूर धुमाळ याला सांगताच स्वयम याला कायमचा संपविण्याचा निर्धार करून युवती आणि मयुरेश त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न गुरुवारी रात्री करीत होते, मात्र तो सापडला नाही. शुक्रवारी सकाळीच मयुरेश कोयत्यासह मृत स्वयम याच्या राहत्या घरी अष्टविनायक चौक कोपरी येथे पोहोचला. घरी स्वयम एकटाच होता. मयुरेश आणि स्वयम यांच्यात वादावादी झाली. नग्न फोटो डिलीट करण्यास नकार देणाऱ्या स्वयम याच्यावर मयूरने कोयत्याने वार करून त्याची हत्या केली.