Tehsildar transfer 2023 : राज्यातील सात तहसीलदारांच्या बदल्या, तर दोन तहसीलदारांची पदस्थापना, कुणाची कोठे झाली बदली, जाणून घ्या पटकन !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Tehsildar transfer 2023 : राज्याच्या महसुल विभागातील उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्यांचे सत्र सध्या सुरु आहे. राज्य सरकारने आज राज्यातील सात तहसीलदारांच्या बदल्या केल्या आहेत तर दोन तहसीलदारांची पदस्थापना केली आहे. बदली झालेल्या तहसीलदारांमध्ये पुणे महसुल विभागातील तीन तर नाशिक महसुल विभागातील पाच तहसीलदारांचा समावेश आहे. राज्याचे उप सचिव अजित देशमुख यांनी तहसीलदारांच्या बदल्याचे जारी केले आहेत.
नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील पुरवठा विभागाचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांची धुळे जिल्ह्यातील साक्री येथे बदली करण्यात आली आहे. साहेबराव सोनवणे साक्रीचे नवीन तहसीलदार असणार आहेत.( Sakri Tehsildar Sahebrao Sonawane)
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी योजनेच्या तहसीलदार दिपाली गवळी यांची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात (पुरवठा) तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे. (Dipali Gawali)
नाशिक शहर धान्य वितरण अधिकारी नितीन गर्जे यांची नंदुरबार येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे. ( Nandurbar Tehsildar Nitin Garje)
नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले योगेश शिंदे यांची नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात संजय गांधी योजना येथे पदस्थापना करण्यात आली आहे. (Yogesh Shinde)
नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले फसियोद्दीन शेख यांची सोलापूर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. फसायोद्दीन शेख यांची बार्शी तहसीलदार म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे. (Barshi Tehsildar Fasiouddin Shaikh )
तसेच नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले राजेंद्र ननज यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार (महसुल) अजित कुऱ्हाडे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी बदली करण्यात आली आहे. (Rajendra Nanaj)
सुरगाणाचे तहसीलदार सचिन मुळीक यांची आटपाडी (सांगली) येथे बदली करण्यात आली आहे. सचिन मुळीक आटपाडीचे नवे तहसीलदार असणार आहेत. (Atpadi Tehsildar Sachin Mulik)
पुणे विभागातील तीन तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, यामध्ये खेडचे तहसीलदार म्हणून प्रशांत बेडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशांत बेडसे हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते.(Khed Tehsildar Prashant Bedase)
नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या अभिजीत जाधव यांची फलटणचे तहसीलदार म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे. Faltan Tehsildar Abhijit Jadhav)
दरम्यान, सुनिल शेरखाने व अजित कुर्हाडे यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येणार असल्याचे बदली आदेशात म्हटले आहे.
बदली झालेल्या तहसीलदारांचे नाव आणि नावासमोर बदलीचे ठिकाण
- साहेबराव सोनवणे – तहसीलदार साक्री
- दिपाली गवळी – तहसीलदार -नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय (पुरवठा)
- नितीन गर्जे – तहसीलदार नंदुरबार
- फसायोद्दीन शेख – पदस्थापना – तहसीलदार बार्शी, सोलापूर
- योगेश शिंदे – तहसीलदार-संजय गांधी योजना, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक
- राजेंद्र ननज – तहसीलदार (महसुल), पुणे जिल्हाधिकारी कार्यालय
- सचिन मुळीक – तहसीलदार आटपाडी (सांगली)
- प्रशांत बेडसे – तहसीलदार खेड
- अभिजीत जाधव – पदस्थापना – तहसीलदार फलटण