(The digital revolution should be used for the benefit of society) डिजिटल क्रांतीचा उपयोग समाजहितासाठी व्हावा : प्राचार्य श्रीकांत होशिंग
शशिकांत देशमुख व सुदाम वराट यांचा ल.ना. होशिंग विद्यालयाच्या वतीने सत्कार संपन्न
जामखेड टाईम्स वृत्तसेवा: पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजाचा आरसा म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते.आपल्या कामाची प्रसिद्धी जगभरात पोहोचवण्याचे काम पत्रकार करतात. सध्याचे युग हे डिजिटल युग आहे.(digital revolution) त्यामुळे डिजिटल मिडीयाला सध्या चांगले दिवस आले आहेत. आपल्या आसपास घडणारी एखादी छोटी मोठी घटना डिजीटल मिडीयाच्या माध्यमातून काही क्षणात जगभरात जाते. ही डिजीटल क्रांती समाजहितासाठी वापरणे आवश्यक आहे. यातूनच आधुनिक भारताची उभारणी होईल असे प्रतिपादन प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी केले. (The digital revolution should be used for the benefit of society)
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेच्या सचिवपदी शशिकांत देशमुख यांची तर महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या जामखेड तालुका उपाध्यक्षपदी सुदाम वराट यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल ल. ना. होशिंग विद्यालयाच्या वतीने मंगळवारी दोन्ही पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.(The digital revolution should be used for the benefit of society)
यावेळी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे (The People’s Education Society Jamkhed) खजिनदार राजेशजी मोरे, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक रमेश अडसुळ, ज्येष्ठ शिक्षक उदयकुमार दाहितोडे, राजकुमार थोरवे, पी. टी. गायकवाड,बी. ए. पारखे, यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे यांनी केले. सुत्रसंचालन अनिल देडे यांनी केले तर आभार संजय कदम यांनी मानले.(The digital revolution should be used for the benefit of society)
यावेळी सत्काराला उत्तर देताना संस्थेचे नवनिर्वाचित सचिव शशिकांत देशमुख म्हणाले की, संस्थेच्या चांगल्या कामासाठी व विद्यार्थी विकासाच्या धोरणाला माझे नेहमीच सहकार्य राहील महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपाला आणण्यासाठी आपण सर्वजन एकत्र येऊन समन्वयाने काम करू.