आमदार रोहित पवार | २९४ दिवसांच्या एकजुटीला युवा उद्योजकाने दिलेले बळ कौतुकास्पद !
श्रमदान, स्वच्छता, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन कार्याला हातभार
कर्जत ( अफरोज पठाण ): कर्जत येथील सर्व सामाजिक संघटनांच्या कार्यामुळे कर्जतचे नाव एका विशिष्ठ उंचीवर पोहचले असून भविष्यात आणखी मोठे उद्दिष्ठ आपण सर्वांच्या प्रयत्नाने गाठाल अशी अपेक्षा आहे असे प्रतिपादन आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले.
कर्जत येथील सर्व सामाजिक संघटनेच्या कार्याला पुणे येथील युवा उद्योजक राहुल मांढरे यांनी एक चार चाकी वाहन भेट दिले, यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार रोहीत पवार बोलत होते. यावेळी युवा उद्योजक राहुल मांढरे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, निवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल यांच्यासह सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ.पवार म्हणाले की,सर्व सामाजिक संघटना गेल्या २९४ दिवसांपासून कर्जत शहर आणि परिसरात श्रमदानाच्या माध्यमातुन स्वच्छता, वृक्षारोपणासह पर्यावरणासाठी काम केले आहे. याचे फलित म्हणून राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून कर्जतची राज्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यात नगरपंचायतला दोन कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले असून एक कोटी रुपये नगरपंचायतला वर्ग झाले आहे. यापुढे आपल्या सर्वांच्या प्रयत्नांने निश्चित मोठे उद्दिष्ठ गाठाल अशी अपेक्षा आहे.आपल्या कार्यामुळे उद्योजक राहुल मांढरे यांनी आपल्याला जे वाहन भेट दिले आहे हा स्तुत्य उपक्रम आहे असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले..
यावेळी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात बोलताना राहुल मांढरे म्हणाले की,कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना हे गेल्या २९४ दिवसांपासून श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन करीत आहे. हे कार्य नि स्वार्थ भावनेने सुरू आहे.आणि या कार्याला आपल्याकडून हातभार म्हणून हे वाहन सुपूर्द केले आहे.
मागील २९४ दिवसांपासून तो रथ सामाजिक कार्यकर्ते अभय बोरा यांच्या संकल्पनेतून सर्व सामाजिक संघटनेचा शिलेदार म्हणून काम करीत आहे. आज राहुल मांढरे यांच्या साह्याने तोच रथ सामाजिक संघटनेला बहाल करण्यात आला आहे. माझी वसुंधरा स्पर्धेत यासह स्वच्छ भारत अभियानाच्या श्रमदानात सुद्धा हा रथाने महत्त्वपूर्ण योगदान बजावले आहे.
एडीट-सत्तार शेख