जामखेड टाईम्स वृत्तसेवा : गडकिल्ल्यांच्या माध्यमातून अॅडव्हेन्चर इन्स्टिट्यूट सुरु करायला हवी. मॉडर्न टेक्नॉलॉजी आत्मसात करून किल्ले पर्यटनात व्हर्चुअल रिअॅलीटीचा अवलंब करायला हवा, राज्यातील महत्वाच्या पाच किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा द्यायला हवा व किल्ल्यांचे शास्त्रोक्त पध्दतीने Documentation व्हायला हवे असे वक्तव्य करत आमदार रोहित पवारांनी गड किल्ल्यांसंदर्भात नवी मागणी पुढे केली आहे. (This demand was made by MLA Rohit Pawar regarding forts)
सृजन वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय दुर्गराज गडकिल्ले बांधणी स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषीक वितरण सोहळा नुकताच पुण्यातील घोले रोड येथील पं. जवाहरलाल नेहरू सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी आमदार रोहित पवार बोलत होते. यावेळी दुर्ग अभ्यासक व लेखक रामनाथ आंबेरकर आणि संवर्धन अभ्यासक मृदूला माने तसेच ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई व प्रकाश अकोलकर, स्पर्धेचे परिक्षक प्रमोद बो-हाडे या मान्यवरांसह दुर्गराज गडकिल्ले बांधणी स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक मोठ्या संख्येने या पारितोषीक वितरण सोहळ्याला उपस्थित होते.या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यावेळी मुंबई येथील अभंग रीपोस्ट बँडने विठ्ठलनामाचा गजर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषीके देऊन गौरवण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, राज्यातील गडकिल्ले हा आपल्या परंपरेचा एक ऐतिहासिक ठेवा आहे. आज तरूणाई मोठ्या प्रमाणावर दुर्गसंवर्धनात काम करते, मात्र या कार्याला एक व्यापक स्वरूप यायला हवे,महाराजांच्या विचारांचा प्रसार, गडकिल्ल्यांवरील स्वच्छता व संवर्धन हीच खरी शिवभक्ती आहे असे मत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी केले.
राज्यभरात ३० जिल्ह्यांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत १० हजारहून अधिक स्पर्धकांनी, तर ३०० मित्र मंडळांनी सहभाग नोंदवला. युवांमध्ये एक संघटनात्मकता व सकारात्मकता निर्माण व्हावी तसेच कोरोना महामारीमुळे घरी असणा-या विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळून त्यांच्यात सृजनशीलता निर्माण व्हावी, आपला सांस्कृतिक वारसा जोपासण्याबरोबरच ऐतिहासीक महत्व दृढ व्हावे हा या स्पर्धा आयोजनामागचा मुख्य उद्देश होता.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुणाल रेगे यांनी केले.