Top News Of The Day : माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांनी उचलले मोठे पाऊल, पुण्यात 21 वर्षीय तरुणीवर गैंगरेप, बिल्डरपुत्राची हत्या आणि आज दिवसभरातील इतर प्रमुख बातम्या

Top News Of The Day : महाराष्ट्रात आज ४ ऑक्टोबर २०२४ अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. यामध्ये सर्वात मोठी घडामोड मंत्रालयातून समोर आली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी उचललेल्या मोठ्या पावलामुळे मोठी खळबळ उडाली होती. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आदिवासी समाजाचे आमदार आक्रमक झाले आहेत. शुक्रवार दुपारी मंत्रालयातील संरक्षण जाळीवर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व त्यांच्या सहकारी आमदारांनी उड्या मारल्या. त्यांचे हे अंदोलन देशभर चर्चेत आलं.

Top News Of The Day, Harshvardhan Patil big announcement, Assembly Vice Speaker Narahari Jirwal's big step, 21-year-old girl gang-rape, builder's son's murder and other major news of the today

दुसरीकडे राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली. भाजपचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम ठोकण्याची घोषणा केली. इंदापुर विधानसभा निवडणुक लढवायचीच या इराद्याने त्यांनी आपला पुढील राजकीय निर्णय जाहीर केला.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आपल्या समर्थकांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. याबाबत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत घोषणा केली.

विरोधीपक्ष नेते राहुल गांधी शनिवारी कोल्हापूर दौर्‍यावर

विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आज कोल्हापूर दौर्‍यावर येणार होते, परंतू अचानक त्यांचा दौरा रद्द झाला. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचा हा दौरा रद्द झाला. परंतू ते उद्या ५ रोजी कोल्हापूरला येणार आहेत. कसबा बावड्यात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जगातील पहिल्या बहुशस्त्रधारी पुतळ्याचं अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. उद्या ५ रोजी राहुल गांधी कोल्हापूर दौर्‍यावर असणार आहे. संविधान सन्मान संमेलनाला ते संबोधित करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्र दौर्‍यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या ५ रोजी महाराष्ट्र दौर्‍यावर असणार आहेत. वाशिम जिल्ह्यात ते उद्या सकाळी असणार आहेत. विविध विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते सायंकाळी ठाण्यात असणार आहेत.

वाशिममध्ये सुमारे 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असून बंजारा समाजाचा समृद्ध वारसा साजरा करताना, पंतप्रधान मोदी बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन देखील करणार आहेत.

मुंबई मेट्रो लाईन 3 फेज – 1 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी विभागाचे पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. तसेच ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि एलिव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे विस्ताराची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. बीकेसी आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान ते मेट्रोतून प्रवास

पुण्यात 21 वर्षीय तरूणीवर गैंगरेप

Bopdev ghat News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रासमवेत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या एका तरुणीवर सामुहिक अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तिघा जणांच्या एका टोळक्याने २१ वर्षीय तरुणीचे अपहरण केले. तिच्या मित्राला बांधुन ठेवले. त्यानंतर तिघा तिच्यावर बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यात बिल्डरपुत्राची हत्या

Swayam Paranjape thane : आक्षेपार्ह फोटो काढून एका तरूणीला सतत ब्लॅकमेल करणे एका बिल्डर पुत्राला चांगलेच भोवले. २० वर्षीय पीडित तरूणीला बिल्डर पुत्राकडून सतत ब्लॅकमेल केले जायचे. याच जाचातून तिची सुटका करण्यासाठी तिच्या मित्राने टोकाचे पाऊल उचलले. त्याने बिल्डर पुत्रावर कोयत्याने 50 वार करत त्याचा कायमचाच काटा काढला. स्वयम शैलेश परांजपे (Swayam Paranjape thane) असे मयत बिल्डर पुत्राचे नाव आहे. ठाण्यात भर सकाळी हत्येचा थरार रंगल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

स्वयम परांजपे (वय 33) हा ठाण्यातील एका बिल्डरचा मुलगा आहे. एका तरूणीला ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणात त्याची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी मयुर नंदू धुमाळ (वय २४) व त्या तरूणीला कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Swayam Paranjape News)

मंत्रिमंडळ निर्णय आजचे

मुंबई  : राज्य मंत्रिमंडळाची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने निर्णयांचा धडाका लावला. सरकारने तब्बल 33 मोठे निर्णय घेतले. मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने कोणते निर्णय घेतले जाणून घेऊयात.

राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ, महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार, दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी  प्रकल्पाच्या कामास मान्यता, टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व. अनिल भाऊ बाबर यांचे नाव, पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती देणार सिल्लोड मधील जमिनीला सिंचन, प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद,

राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिक रक्कम वाढवली, राज्यातील आणखी 104 आयटीआय संस्थांचे नामकरण, संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार, लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण,

कोकण पुणे विभागासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन कंपन्या, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करणे,

जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ,आजरा तालुक्यातील वेळवट्टी, गवसे, घाटकरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणार, बंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिल, कागल येथील सागावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय, महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार, कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव,

बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार 2604 कोटीस मान्यता, राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार १ लाख ६० हजार कोटींचे गुंतवणूक अपेक्षित, उच्च तंत्रज्ञानावरील अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन, राळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण,

शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवणार ,बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजना, सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणार, वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार, डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना,

वडाळा सॉल्ट पॅनमधील भूखंड शैक्षणिक कारणांसाठी, रमाई आवास, शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात वाढ.