जामखेड टाइम्स वृत्तसेवा : दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे (Disability Welfare Commissionerate pune) यांच्यामार्फत शासन मान्यताप्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलुर (Tulja Bhawani Handicapped Training Centre, Degalur) या संस्थेत मान्यताप्राप्त अभ्यासकमासाठी 18 ते 40 वयोगटातील अपंग मुकबधीर, मतिमंद मुला-मुलींना शिवण कर्तनकला, कॉम्प्युटर अकाऊटींग व ऑफीस ऑटोमेशन व वेल्डर कम फॅब्रीकेटर अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशितांची निवासाची व जेवणाची विनामुल्य सोय केलेली आहे.
इच्छुक अपंग, मुकबधीर व मतिमंद मुला-मुलींनी किंवा पालकांनी दि. ५ जुलै, २०२३ पर्यंत प्राचार्य,तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर जि.नांदेड येथे पत्रव्यवहार करावा अथवा समक्ष भेटावे. अधिक माहितीसाठी 9960900369, 9403207100,
7378641136, 9420846887 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.