जामखेड टाईम्स वृत्तसेवा | गेल्या काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होत आहेत. अवेळी पाऊस पडल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे. येत्या तीन दिवसांत महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. (Rain forecast for next three days in Maharashtra, warning issued by meteorological department)
हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार अहमदनगरसह पश्चिम महाराष्ट्रातील बहूतांश भागात दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ऐन रब्बी हंगामातील पिकांना मात्र यामुळे धोका होणार असल्याने शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत.
- Maharashtra Vidhan Parishad Sabhapati niwadnuk 2024 : विधानपरिषद सभापती पदासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, राम शिंदे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड होणार !
- Maharashtra Legislative Council Speaker Election 2024 : अखेर ठरलं ! कर्जत जामखेडचे ‘रामराजे’ होणार विधानपरिषदेचे सभापती, आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नावाची भाजपकडून अधिकृत घोषणा !
- Maharashtra Dropped Ministers List : एकनाथ शिंदे सरकारमधील १२ मंत्र्यांना का डावलण्यात आले ? नेमके कारण काय ? जाणून घ्या सविस्तर
- Mahayuti News Today : मंत्रिपदाची संधी हुकल्याने महायुतीत नाराजीची लाट, ऐन कडाक्याच्या थंडीत राजकारण तापले
- Meghana Deepak Sakore Bordikar : आयपीएस अधिकाऱ्यांच्या पत्नीचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश !
ऐन हिवाळ्यात गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी (Non seasonal rainfall) लावली आहे. दरम्यान काही ठिकाणी झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.असं असताना राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहेत.
आज पासून पुढील तीन दिवस मुंबई पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढताना दिसत आहे.
हवामान खात्याने आज पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यात ढगाळ हवामानाची (Cloudy weather) नोंद केली आहे.आज सकाळापासूनच याठिकाणी ढगाळ हवामान आहे. पुढील दोन तीन तासात या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
तर उद्या राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आधीच पावसाळ्यात अतिवृष्टीने येथील शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे.अशात पुन्हा एकदा येथे अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहेत.
उद्या मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या अकरा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.त्यामुळे विकेंडला फिरायला जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
परवा (रविवारी) राज्यात पावसाचा जोर कमी होणार असून यादिवशी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतच पावसाची शक्यता आहे.दुसरीकडे, 23 जानेवारी नंतर राज्यात पुण्यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारठा (Cold wave in maharashtra) वाढण्याची शक्यता आहे. हा थंडीचा जोर पुढील दोन दिवस कायम राहणार आहे.त्यानंतर राज्यातील हवामान सामान्य होण्याची शक्यता आहे
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मागील आठवड्यात विदर्भात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले होते. गारपीट झाल्याने शेतीचे नुकसान झाले होते.
यंदा पावसाने राज्यात दमदार हजेरी लावली. महापुराने मोठे नुकसान राज्यात झाले. शेतीचे नुकसान झाले. अनेक भागात जिवीत हानी झाली होती. आता अवकाळी पाऊस अधून मधून पडत आहे. सध्या रब्बी पिके जोमात आहेत. ढगाळ हवामानामुळे पिके रोगांना बळी पडण्याचा धोका आहे.