केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात सातारा जिल्ह्यातील वाई परिसरात हा अपघात घडला. आठवले यांच्या गाडीला कंटनेरने धडक दिली. या अपघातात रामदास आठवले यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने रामदास आठवले या अपघातातून सुखरुप बचावले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. अपघातानंतर रामदास आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. (Ramdas Athawale Car accident news)
रामदास आठवले वाईहून मुंबईच्या दिशेला येत होते. या दरम्यान एका कंटेनरने त्यांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात आठवले यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. (Ramdas Athawale car accident news today)