महिलेच्या प्रश्नांवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी जोडले हात, महिलेनेही दिले सडेतोड उत्तर, नेमकं काय घडलं वाचा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे आपल्या रोखठोक बोलण्याच्या शैलीमुळे नेहमी चर्चेत असतात आता दानवे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दानवे हे एका महिलेला हात जोडत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. नेमकं असं काय घडलं ? पाहूयात.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे यांची नुकतीच एक पत्रकार परिषद झाली. यात एका महिलेने दानवे प्रश्न विचारला होता, त्यावर दानवे तिला सांगतात की, “दोन वेळा सांगितलं तुला. आणखी काय सांगू. ” यावर ती महिला सातत्याने आपल्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बोलत राहते. मला बोलू द्या, मला बोलायचं आहे, मला बोलायचा अधिकार आहे. माझा प्रश्न मांडायचा आहे, असं ही महिला म्हणते. त्यावर दानवे हात जोडून तिला म्हणतात, “मावशे थांब आता. ” त्यावर ती महिला लगेचच त्यांना म्हणते, “हात जोडू नका, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या.”
हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. “मला जर बोलू दिलं नाही, तर कोणाला न्याय मिळणार नाही इथे. मला बोलायचा अधिकार आहे, संविधानाने कायद्यात तरतूद केली आहे. आमच्यासाठीच तुम्ही खुर्चीत बसला आहात”, असं ही महिला या व्हिडीओमध्ये म्हणत आहे. शिवसेनेच्या नेत्या शिल्पा बोडखे यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हात काय जोडता? जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या, असं बोडखे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.