पिंपरी चिंचवड : हिंजवडी आयटी पार्कमध्ये (Hinjewadi IT Park) नोकरीस असलेल्या एका साॅफ्टवेअर इंजिनिअर तरूणीची (Vandana Dwivedi) भल्या पहाटे गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. (pune crime news today)
हिंजवडी आयटी पार्कमध्ये साॅफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या वंदना द्विवेदी या महिलेचा मृतदेह हिंजवडी परिसरातील एका हॉटेलमध्ये आढळून आला आहे. मयत वंदना द्विवेदी व ऋषभ निगम (Rishabh Nigam) हे दोघे गेल्या दोन दिवसांपासून हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होते. रविवारी भल्या पहाटे ऋषभ निगम याने वंदनाची गोळ्या झाडून हत्या केली.
मयत वंदना व आरोपी ऋषभ दोघेही उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील रहिवासी आहे. दोघे हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरीस होते. मयत वंदना व ऋषभ यांच्यात प्रेम संबंध होते. प्रेमप्रकरणातून ऋषभने वंदनाची हत्या केल्याचे बोलले जात आहे.
वंदनाची हत्या करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ऋषभला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांच्या नाकाबंदीत ऋषभला अडकला. पोलिसांनी त्याच्याकडून पिस्टल जप्त करत त्याला अटक केली. पुढील तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.