Vasant More : अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा म्हणत निष्ठावंत शिलेदाराने सोडली राज ठाकरेंची साथ, पुण्यात मनसेला मोठा धक्का, वसंत मोरेंनी दिला मनसेचा राजीनामा !

Vasant More Latest News : राज्याच्या राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या राजकीय पक्षांना रोज राजकीय धक्के बसत असतानाच आता राज ठाकरे (Raj Thackeray MNS) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेलाही आज मोठा धक्का बसला आहे. मनसेचा राज्यातील सर्वात चर्चित चेहरा असलेल्या पुण्यातील वसंत (तात्या) मोरे (Vasant More Pune) या निष्ठावंत सैनिकाने राज ठाकरेंची साथ सोडण्याची घोषणा केली आहे. वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मोरे यांच्या रूपाने मनसेला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. (Vasant More resigned from MNS)

Vasant More latest news today, Last Jai Maharashtra, Loyal Shiledara left Raj Thackeray's support saying, Sir, I am sorry, big blow to MNS in Pune,

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते, जेष्ठ नगरसेवक वसंत (तात्या) कृष्णाजी मोरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मोरे यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा आज दुपारी फेसबुकवर पोस्ट लिहीत केली आहे. अखेरचा जय महाराष्ट्र.. साहेब मला माफ करा असे लिहीत वसंत मोरे यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये वसंत मोरे यांनी राजीनामा पत्र आणि काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मोरे हे राज ठाकरे यांच्या फोटोपुढे दर्शन घेत असल्याचे दिसत आहे.

Vasant More pune latest news today, Last Jai Maharashtra, Loyal Shiledara left Raj Thackeray's support saying, Sir, I am sorry, big blow to MNS in Pune,

वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा देताना लिहीलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलयं ?

प्रति,
मा. श्री राजसाहेब ठाकरे,
संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

विषय: माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात.

आपणांस सप्रेम जय महाराष्ट्र..!

पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहका-यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ‘कोंडी’ करण्याचे ‘तंत्र’ अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.

धन्यवाद..!

आपला विश्वासू,
वसंत (तात्या) मोरे,
कात्रज पुणे.

Vasant More pune latest news today, Last Jai Maharashtra, Loyal Shiledara left Raj Thackeray's support saying, Sir, I am sorry, big blow to MNS in Pune,