ED raids MP Bhavana Gawli’s property :खासदार भावना गवळी यांच्या मालमत्तांवर ईडीची छापेमारी

ईडीचा मोर्चा विदर्भात: शिवसेना पुन्हा टार्गेट

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : maharashtra breaking news | भाजप विरूध्द शिवसेना हा वाद आता टोकाला पोहचला आहे.  दोन्ही पक्षातील सत्तासंघर्षात ‘ईडी’ महत्वाची भूमिका बजावत आहे. रविवारी ईडीने परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस बजावल्यानंतर सोमवारी ईडीने शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या वाशिम इथल्या मालमत्तांवर छापेमारी केली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. (ED raids MP Bhavana Gawli’s property)

भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेमुळे शिवसेना-भाजप यांच्यातील वाद चांगलाच टोकाला गेला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक प्रकरणामुळे हा वाद आणखी चिघळला आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना सक्तवसूली संचालयाने अर्थात ईडीने (Enforcement Directorate) रविवारी पाठवल्यानंतर राजकीय वर्तुळातून तिखट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. (ED raids MP Bhavana Gawli’s property)

maharashtra breaking news |परब यांच्यानंतर ईडीने शिवसेना शिवसेना खासदार भावना गवळी यांना टार्गेट केले आहे. वाशीम इथल्या मालमत्तांवर ईडीची छापेमारी सुरू केली आहे.एकूण 5 ठिकाणांवर ईडीची छापेमारी सध्या सुरू आहे.एकंदर पाहता शिवसेनेच्या नेत्यांच्या अडचणींमध्ये रोज वाढ होताना दिसत आहे. (ED raids MP Bhavana Gawli’s property)

maharashtra breaking news | खासदार भावना गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या महिला प्रतिष्ठान, बालाजी पार्टीकल बोर्ड सहकारी संस्था, बीएएमएस कॉलेज, भावना ऍग्रो प्रॉडक्ट याठिकाणांवर छापेमारी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.Preliminary information has come to light that raids are being carried out on Mahila Pratishthan, Balaji Particle Board Co-operative Society, BAMS College, Bhanwa Agro Products, which are affiliated to MP Bhavana Gawli.

या सर्व प्रकरणामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये जो वाद आहे तो अधिक रंगण्याची शक्यता आहे. संबंधित छापेमारीचे वृत्त झी चोवीस तासने दिले आहे.

Web title: ED raids MP Bhavana Gawli’s property