नागपूर (निता सोनवणे) : हाॅस्पीटल म्हटलं की लक्षात येते ते मानवांचे (People’s Hospital) आणि पाळीव प्राण्यांचे इस्पितळं (Pets hospitals) पण कुणी वन्यजीवांचे इस्पितळ (wildlife hospital) ऐकलंय का? बहुतेक क्वीचतचं लोकांनी या विषयी ऐकले वा वाचले असेल. मुळात ही संकल्पनाच नवीन आहे. मात्र मुक्या जीवांचा विचार करुन त्यांना जीवनदान देण्याचे महान कार्य महाराष्ट्राच्या वऱ्हाड प्रांतातील नागपूर (nagpur) शहरात सुरू आहे.
कुंदन हाते (kundan hate) या अवलीया निसर्गप्रेमीने शासनाच्या मदतीने भारतातील पहिले वन्यजीव हाॅस्पीटल नागपुरात उभारले आहे. वन्यजीवांवरील त्यांच्या निस्सीम प्रेमाची पोचपावती म्हणून 2016 मध्ये महाराष्ट्र सरकारने 6 हजार स्क्वेअर फुट जागेत सुसज्ज असे हाॅस्पीटल (wildlife hospital) बांधून दिले आहे. मागील 25 वर्षापासून त्यांनी स्वतःला वन्यजीवांच्या सेवाकार्यात (wildlife service) झोकून दिले आहे.
मुळात कमर्शिअल आर्टीस्ट (commercial artist) असलेले कुंदन हाते (kundan hate) हे आपल्या कामापेक्षा या सेवाकार्याला (wildlife service) जास्त महत्त्व व वेळ देतात. बिनपगारी फुल अधिकारी म्हणून कुंदन हाते येथील कार्य बघतात. वन्यजीवांवरील प्रेमापोटी पूर्वी ते वेलेंटियर म्हणून वनविभागातील कर्मचा-यांची मदत घेत जख्मी पक्षी व प्राण्यांवर इलाज करत असत. जसजसे कामाला यश मिळत गेले तसतसे पेशंट (patient) वाढले.
मात्र पुरेसी साधन सामुग्री व मनुष्यबळ हाताशी नव्हते. वन्यजीवांकरीता एक हक्काचे इस्पितळ असावे असा विचार त्यांच्या डोक्यात शिवून गेला आणि त्यांनी 2012 मध्ये हा प्रस्ताव महाराष्ट्र शासनासमोर मांडला.शासनाने तो मान्य करत 2016 मध्ये शहरातील सेमीनरी हिल (Seminary Hill Forest Range) येथील वनपरिक्षेत्रात वन्यजीव(wildlife) प्राण्यांचे इस्पितळ उभारुन दिले.
या इस्पितळात प्रत्येक वन्यजीवांना स्वतंत्र ठेवण्याची सोय केली आहे. प्रत्येक वन्यजीवाला त्यांना लागणाऱ्या तापमानात सुरक्षित ठेवण्यासाठी एसी (AC) व हिटरची (Heater) सुद्धा व्यवस्था केली गेली आहे. या ठिकाणी सुसज्ज असे ऑपरेशन थियेटर (Operation Theater) सुद्धा आहे.उडणारे पक्षी असो वा सरपटणारे प्राणी, नवजात पिल्लांपासून ते थेट मोठया प्राण्यांपर्यंत येथे सगळेच उपचार घेतात. गरजेनुसार प्रत्येकांचे येथे ऑपेरशन होते. रिकवरी रेट 70 ते 80 टक्के इतका आहे.
आतापर्यंत या इस्पितळात 35 हजार वन्यजीवांवर उपचार करण्यात आले आहे. येथे डॉ. मयुर काटे व डॉ. सैय्यद बिलाल (Dr.Mayur Kate and Dr. Syed Bilal) हे दोन सर्जन नेमले आहेत. यापैकी एक न्युट्रीशीयन (Nutritionist) म्हणून प्राण्यांची काळजी सुद्धा घेतात. हे दोन्ही डॉक्टर 24 तास सेवा पुरवितात. याशिवाय येथे 3 फॉरेस्ट अधिकारी, 6 वनरक्षक, 2 महिला कर्मचारी, 8 हेल्पर व 3 ड्रायव्हर आहेत. पेशंटला (वन्यजीव) आणण्याकरीता सुसज्ज अशी एक अॅम्बुलन्स व एक पेट्रोलिंग कार येथे उपलब्ध आहे.
wildlife hospital near me असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल तर आपल्या महाराष्ट्रातील विदर्भात परतवाडा व चंद्रपूर याठिकाणी सुद्धा हे इस्पितळ सुरू आहेत. मात्र नागपूर येथील इस्पितळ मुख्य वन्यजीव उपचार केंद्र म्हणून ओळखल्या जाते (wildlife hospital) या इस्पितळाचा आदर्श समोर ठेवून महाराष्ट्रात इतर 11 सर्कलमध्ये 11 उपचार केंद्र सुरु करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे. तसा जीआर सुद्धा काढण्यात आाला आहे. महाराष्ट्रात नागपूर व्यतीरिक्त कोल्हापूर (kolhapur) येथे सुद्धा वन्यजीवांचे (wildlife)इस्पितळ आहे.
नागपुरच्या या उपचार केंद्राला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.बर्ड फ्लूच्या काळजीपोटी येथे आयसोलेशन वार्ड तयार केले गेले आहे. भारतीय अनिवासी सुद्धा या इस्पितळाशी (wildlife hospital) जुळले गेले आहेत. विदर्भातील विविध ठिकाणाहून अतिदक्षता विभागात उपचाराकरीता वन्यजीवांना (wildlife) आणले जाते. त्यामुळे येथील जागा व मनुष्यबळ अपूरे पडत असल्याने शासनाकडून परवानगी घेऊन हे उपचार केंद्र 10 हजार स्क्वेअर फिटमध्ये उभारण्याचे काम सुरु झाले आहे.
कूंदन हाते (kundan hate) यांची समर्पित सेवाभाववृत्ती बघून महाराष्ट्र सरकारने नुकतीच त्यांची ‘वन्यजीव सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी’ (kundan hate Member of the Wildlife Advisory Board) निवड केली आहे.शिवाय त्यांना ‘मानद वन्यजीव रक्षक (Wildlife keepers) म्हणून गौरविण्यात आले आहे.कुंदन हाते यांचा पुढचा एजेंडा ट्रेनिंग सेंटर सुरु करणे, वन्यजीवांविषयी जनजागृती करणे, कार्यक्रमावर भर देणे, तसेच प्रोग्राम डिझाईन करणे हा असणार आहे. इच्छुक दानदात्यांना येथील वन्यजीवांकरीता दान देण्याची सोय सूद्धा करुन दिली गेली आहे.