जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहर भाजपमय करण्यासाठी कार्यकर्ते व बुथप्रमुखांनी शहरातील सर्व प्रभागात भाजप सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करून घ्यावी, पक्षाने दिलेल्या टार्गेटपेक्षा अधिकची सदस्य नोंदणी व्हावी यासाठी सर्वांनीच जोमाने कामाला लागावे, असे अवाहन भाजपचे जामखेड शहराध्यक्ष पवनराजे राळेभात यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या आदेशानुसार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संघटन प्रभारी रविंद्र चव्हाण व विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड शहर भाजपच्या वतीने ९ जानेवारी रोजी प्राथमिक सदस्य नोंदणी महाअभियानाचा खर्डा चौकात मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात पवनराजे राळेभात बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना राळेभात म्हणाले की, देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी भाजपचे हात अधिक बळकट करणे आवश्यक आहे. जामखेड शहर भाजपमय करण्यासाठी शहरातील सर्व समाज घटकातील नागरिक तसेच युवकांनी मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी अभियानात सहभागी व्हावे असे अवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना भाजपा नेते संजय (काका) काशिद म्हणाले की, राष्ट्राला समर्पित भावनेतून काम करणार्या आणि जगभरात सर्वांत जास्त प्राथमिक सदस्य असलेला भाजप हा एकमेव पक्ष आहे, विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानंतर पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे. या अभियानात जामखेड तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा. जामखेड तालुक्यातील प्रत्येक बुथवर २५० सदस्य नोंदणीचे टार्गेट आहे. ते पुर्ण करण्यासाठी गावागावातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे अवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी तालुकाध्यक्ष अजय काशिद, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर, मनोज (काका) कुलकर्णी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, डाॅ विठ्ठल राळेभात, पोपट (नाना) राळेभात, सोमनाथ राळेभात, डाॅ ज्ञानेश्वर झेंडे, डाॅ अल्ताब शेख, प्रविण चोरडिया, तात्याराम पोकळे, अमित जाधव, शाकीर खान, सलिम तांबोळी, उध्दव हुलगुंडे चेअरमन, विष्णू गंभीरे, प्रविण बोलभट, शिवकुमार डोंगरे, तुषार बोथरा, आण्णा ढवळे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष संजीवनी पाटील, महिला आघाडी शहराध्यक्षा संगिता पारे, रूक्साना पठाण, सह आदी पदाधिकारी व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पार पडलेल्या शेकडो नागरिकांनी ऑनलाईन सदस्य नोंदणीत सहभाग घेत भाजपाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले.
असे व्हा भाजपचे प्राथमिक सदस्य
भाजपचे प्राथमिक सदस्य होण्यासाठी 8800002024 या नंबरवर मिस कॉल दिल्यावर एक लिंक प्राप्त होते. त्या लिंकवर क्लिक केल्यावर त्यावर स्वता:चा मोबाईल नंबर टाकून नंतर ओटीपी टाकून आपली संपूर्ण माहिती भरून घ्या व भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य व्हा. असे आवाहन यावेळी प्रविणशेठ चोरडिया यांनी केले आहे.