जामखेड टाईम्स वृत्तसेवा । 17 जानेवारी 2022 । vishal phate barshi | संपुर्ण महाराष्ट्र खळबळ उडवून देणाऱ्या बार्शीच्या फटे स्कॅमचा मुख्य सूत्रधार विशाल फटे (Vishal Fate arrest) हा आज पोलिसांना शरण आला आहे. पोलिसांनी फटेला अटक केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून विशाल फटे विदेशात पळून गेल्या या अफवांना आता विराम मिळाला आहे.(Vishal Fate finally surrendered to the police, Solapur police made an arrest)
शेअर मार्केटच्या माध्यमातून बार्शी शहरासह राज्यातील शेकडो लोकांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडून कोट्यावधी रूपयांचा गंडा घालण्याचे प्रकरण राज्यात गाजत आहे. आर्थिक फसवणुकीचे हे प्रकरण बार्शीतून समोर आले. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विशाल फटे (vishal phate) याने 200 कोटींपेक्षा अधिक रूपयांचा गंडा घातल्याचे बोलले जात होते. (Vishal Fate Arrest)
बार्शीचा हर्षद मेहता विशाल फटे(Vishal phate) याचा भांडाफोड झाल्यानंतर बार्शी पोलिस स्टेशनला त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी फसवणुक झालेल्या गुंतवणूकदारांनी रांगा लावल्या होत्या. दरम्यान विशाल फटे (Vishal Fate Scam ) हा गेल्या काही दिवसांपासून गायब होता. परंतू आज सकाळी विशाल फटे (Vishal phate) याने सोशल मिडीयावर समोर येत एक व्हिडीओ प्रसिध्द करत आपली बाजू मांडत या प्रकरणावर खुलासा केला होता.
विशाल फटे (Vishal Fate Youtube) याने युट्यूबवरून जारी केलेल्या व्हिडीओतून आपण पोलिसात हजर होणार असेही जाहीर केले होते. तसेच काही चुका केल्याचेही कबूल केले होते. विशाल पोलिसांसमोर कधी हजर होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर विशाल फटे(Vishal phate) हा आजच पोलिसाना शरण आला. त्यानंतर पोलिसांनी विशाल याला अटक केली आहे.
- Maharashtra Women Minister Portfolio : महायुती सरकार मधील महिला मंत्र्यांकडे कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी ? जाणून घ्या सविस्तर
- Krushi Mantri Maharashtra 2024 : माणिकराव कोकाटे बनले महाराष्ट्राचे नवे कृषिमंत्री !
- Big News : महायुती सरकारकडून प्रशासनात मोठी खांदेपालट, महाराष्ट्रातील २३ बड्या सनदी अधिकार्यांच्या बदल्या !
- Maharashtra Cabinet portfolio Allocation 2024 : पहिल्यांदाच मंत्री झालेल्या नेत्यांना वजनदार खात्यांची लाॅटरी, तर दिग्गज नेत्यांना मोठा झटका
- Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते? वाचा संपूर्ण यादी
विशाल फटे स्कॅमप्रकरणात (Vishal phate scams) अत्तापर्यंत 18 कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. (Vishal Fate arrested by solapur police) अलका शेअर्स सर्व्हिसेसचा (Alka Shares Services) संचालक विशाल फटेच्या कारनाम्याची राज्यभरात खळबळ उडाली आहे. विशाल फटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एकूण 50 जणांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
आतापर्यंत 18 कोटींना फसवणूक केल्याचे समोर आले आहे. 10 लाख गुंतवणुकीवर कोट्यवधीचे आमिष विशाल फटेनं दिलं होतं. अखेर आज विशाल सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाला आहे. पोलिसांनी विशाल फटेला अटक केली आहे. (Vishal phate news)
याआधीच गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून आरोपी विशाल अंबादास फटे, राधिका विशाल फटे, रामदास गणपती फटे, वैभव अंबादास फटे आणि अलका अंबादास फटे यांच्या विरोधात भा.द. वि.कलम 420, 409, 417, 34 आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात विशालचे वडिल व भाऊ अटकेत आहेत.
विशाल फटे (Vishal phate news) याने आज सकाळी स्वतःच्या युट्युब चॅनेलवरून घडलेल्या गोष्टींबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला होता. माझा लोकांना फसवण्याचा कोणताही हेतू नव्हता, काही चुका झाल्या त्यामुळे पैसे माझे अडकले आहेत. मला माझ्या चुका मान्य असून मी शिक्षा भोगायालाही तयार आहे. त्याचबरोबर आज मी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार असल्याचेही त्याने आपल्या व्हिडीओत (vishal fate video) स्पष्ट केले होते.
काय म्हणाला विशाल फटे ? पहा संपुर्ण व्हिडीओ ⬇️
कालच त्याचा वडील आणि भावाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज विशाल फटे याने व्हिडीओ पोस्ट करुन आपली बाजू स्पष्ट केली. आरोपी विशाल फटेविरोधात 18 कोटींपेक्षा जास्तीची फसवणूक केल्याबद्दल तक्रारी दाखल आहेत. त्याला शोधण्यासाठी बार्शी पोलिसांचे 8 पथकं रवाना झाली होती. दरम्यान, आता खुद्द फटेच पोलिसांसमोर हजर झाला आहे. त्यामुळे याप्रकरणात आणखी किती लोकांना फसवलं असेल याची माहिती समोर येईल.
विशाल फटे परदेशात पळाला ही अफवाच
200 कोटी रूपयांचा गंडा घालून बार्शीचा विशाल फटे हा ठग परदेशातून पळून गेला अशी अफवा गेल्या चार पाच दिवसांपासून राज्यात सुरू होती. परंतू विशाल फटे आज युट्यूबवर व्हिडीओच्या माध्यमांतून समोर आला तसेच सायंकाळी सोलापुर पोलिसांत हजर झाल्याने राज्यात सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. पोलिस तपासात आणखी काय काय समोर येते याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
रिक्षातून आला आणि म्हणाला मी विशाल फटे
दरम्यान विशाल फटे याने आज सकाळीच युट्यूब व्हिडीओत आपली बाजू मांडून पोलिसांत हजर होण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार तो पोलिसांत हजर होण्यासाठी चक्क रिक्षातून गेला. रिक्षातून उतरत तो थेट पोलिसांसमोर हजर झाला आणि म्हणाला मी विशाल फटे. काही वेळ पोलिसही चक्रावून गेले. विशाल फटेला त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. विशाल फटे हा कर्नाटकात लपला होता. तेथून तो बसने सोलापूरला आला. बसस्थानकावर उतरल्यानंतर तो थेट रिक्षाने पोलिस अधिक्षक कार्यालयात रिक्षाने पोहचला. रात्री आठच्या सुमारास विशाल तिथे दाखल झाला. त्यानंतर त्याने स्वता:हून स्वता:ची ओळख पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू केली. वैद्यकीय तपासणी व इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्याला मंगळवारी सोलापुर कोर्टासमोर हजर केले जाणार आहे अशी माहिती पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांनी माध्यमांना दिली.