जामखेड टाइम्स वृत्तसेवा | देशभरात स्वातंत्र्याचे 75 वे अमृत महोत्सवी वर्ष अतिशय उत्साहात साजरे करण्यात आले. अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जामखेड शहरातील संविधान चौकात हजारो नागरिकांच्या साक्षीने 100 फुट तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. आज15 ऑगस्ट रोजी वीरमाता, शासकीय अधिकारी व आमदार रोहित पवार यांच्या हस्ते हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.
कर्जत-जामखेड मतदारसंघात विविध उपक्रमांच्या माध्यमातून आमदार रोहित पवार हे कायमच सकारात्मक वातावरण निर्मितीचे काम करत आले आहेत. यावेळीही त्यांनी याच उद्देशाने समता, बंधुता व एकात्मता उन्नत राखण्यासाठी भव्य 100 फुट उंच तिरंगा जामखेड शहरात उभारला आहे. यासाठी त्यांनी गेल्या काही दिवसात वैयक्तिक पातळीवर पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं. तसेच त्यांनी स्वतः नागरिकांना, विदयार्थ्यांना व मतदारसंघांतील सर्वांनाच यंदाच्या वर्षी स्वातंत्र्य उत्सवाच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले होते.
या सोहळ्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव व स्थानिक नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नावीन्यपूर्ण उपक्रम मतदारसंघात राबवल्याने परिसरातील नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सरसमकर व शिवगंगा मत्रे तर आभार प्रा. मधुकर राळेभात यांनी मानले.
ऊर्दू शाळेच्या मुलींनी जिंकली मने
यावेळी जामखेड ऊर्दू शाळेतील मुलींच्या पथकाने पथसंचलन केले. त्यांनी हजारो नागरिकांची मने जिंकली. त्याचबरोबर नागेश विद्यालय, ल.ना. होशिंग विद्यालयाच्या एनसीसी पथकाने पथसंचलन केले. सर्वांनीच मने जिंकली.
जात धर्म, पंथ विसरून देशाच्या विकासासाठी एकत्र काम – रोहित पवार
दरम्यान ध्वजारोहण झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी नागरिकांना संबोधित केले. या वेळी बोलताना पवार म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी जो त्याग केलेला आहे त्याचे प्रतिक म्हणजे आपला तिरंगा आहे. तिरंगा ध्वजाकडे पाहु देशाच्या विकासाची पताका सर्वांना खांद्यावर घ्यावयाची आहे.
कर्जत – जामखेडच्या विकासासाठी मी तुमचा कार्यकर्ता म्हणून सदैव तुमच्या बरोबर आहे. आपण स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत शेती, शिक्षण, आरोग्य, रस्ते या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. याच प्रगतीचे लक्षण म्हणजे आज मुलींचा जन्मदर वाढला आहे. आपण सर्व देशवासीय जात धर्म, पंथ विसरून देशाच्या विकासासाठी एकत्र काम करत आहोत. सर्वाच्या सहकार्याने आपण प्रगतीपथावर आहोत असे आमदार रोहित पवार म्हणाले.
कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते
यावेळी आमदार रोहित पवार, डॉ. शोभा आरोळे तहसीलदार योगेश चंद्रे, न्यायाधीश जगताप साहेब, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, महिला बाल विकास अधिकारी ज्योती बेल्हेकर, बांधकाम विभागाचे अभियंता संजय कांबळे, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, कृषी अधिकारी अशोक शेळके, वैद्यकीय अधिक्षक संजय वाघ,
गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, महावितरणचे अभियंता गावीत, कदम, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यकांत मोरे, मंगेश आजबे, अभय शिंगवी, उमर कुरेशी,खलील मौलाना, दिपक पाटील, बिलाल शेख, अमोल गिरमे, किसनराव ढवळे, डॉक्टर असोसिएशन, वकिल असोसिएशन, पत्रकार संघटना, यांच्यासह एनसीसी कॅडेट, ल. ना. होशिंग विद्यालय, नागेश विद्यालय, कन्या विद्यालय येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.