जामखेड टाईम्स वृत्तसेवा : karjat Nagar Panchayat election | कर्जत नगरपंचायतीच्या १३ जागेसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी आज पार पडली या छाननीत १३ उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून ६४ उमेदवारांचे ७६ उमेदवारी अर्ज निवडणुकीस पात्र ठरले असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले आणि सहायक निवडणूक अधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.(13 candidature applications rejected in Karjat Nagar Panchayat elections)
कर्जत नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. कर्जत नगरपंचायतीसाठी ७ डिसेंबर अखेर १७ प्रभागासाठी १०० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र सुप्रीम कोर्टाच्या ओबीसी आरक्षण आदेशानुसार तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कर्जत नगरपंचायतीमधील नामप्र ४ प्रभागाची निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यामुळे कर्जत नगरपंचायतीच्या १३ जागेसाठी ८९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
बुधवारी सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले आणि मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त ८९ उमेदवारी अर्जावर छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये पक्षाचे जोडपत्र न मिळाल्याने ८ तर शपथपत्रावर उमेदवाराची स्वाक्षरी नसल्याने ५ असे एकूण १३ अर्ज अवैध ठरले. (13 candidature applications rejected in Karjat Nagar Panchayat elections)
कर्जत नगरपंचायती १३ जागेसाठी एकूण ६४ उमेदवाराचे ७६ अर्ज निवडणुकीस पात्र ठरले. प्रभाग क्रमांक २ जोगेश्वरवाडी प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार लंकाबाई देविदास खरात आणि प्रियंका केतन खरात यांच्या उमेदवारी अर्जावर मंगेश कचरे यांनी हरकत नोंदविली होती. मात्र महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम १९६६ च्या १२ नुसार दोन्ही हरकती फेटाळून लावण्यात आल्या.
तसेच प्रभाग क्रमांक ४ माळेगल्ली येथील आशा बाळासाहेब क्षीरसागर यांनी आपल्या उमेदवारी अर्जाला दोन राजकीय पक्षाचे एबी फॉर्म जोडल्याने त्यांचा शिवसेना पक्षाचा अर्ज अवैध ठरला तर रासपचा अर्ज निवडणुकीस पात्र ठरला.
सोमवार, दि १३ डिसेंबर अखेर उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असल्याने त्यानंतर कर्जत नगरपंचायतीचे पक्षीय निवडणूकीचे चित्र स्पष्ट होईल.