कर्जत – जामखेडमधील 20 बीएलओंचा गौरव, आधार लिंकींगमुळे मतदारयादी क्लिन आणि हेल्दी होणार – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । अहमदनगर जिल्ह्यात मतदानकार्डला आधार लिंक करण्याची प्रक्रिया (Linking Aadhaar to Voter Card) वेगात सुरू आहे. यामध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघ आघाडीवर आहे.या मतदारसंघात 45 टक्के आधार जोडणी प्रक्रिया पुर्ण झाली आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.आधार जोडणीची प्रक्रिया हाती घेतल्यामुळे दुबार मतदार (double voter) शोधता येणार आहेत. तसेच यापुढे आपली मतदारयादी (Voter list) क्लिन आणि हेल्दी असणार आहे, असे सांगत निवडणुक विषयक कामांचा बीएलओ हा कणा आहे,असे गौरवोद्गार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Chief Electoral Officer Shrikant Deshpande) यांनी जामखेडमध्ये बोलताना काढले.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे 16 सप्टेंबर 2022 रोजी जामखेड दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात सुरु असलेल्या आधार जोडणी कामाचे त्यांनी कौतुक केले. तसेच प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले, तहसीलदार योगेश चंद्रे, तहसीलदार नानासाहेब आगळे,निवडणूक नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांचे अभिनंदन केले.
तसेेच यावेळी शंभर टक्के आधार जोडणी करणाऱ्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील 20 मतदान केंद्रीयस्तरीय अधिकाऱ्यांचा (BLO) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडून गौरव करण्यात आला. यावेळी उपजिल्हा निवडणुक अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार शितोळे, नायब तहसिलदार गोसावी, नायब तहसिलदार रोडे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ सह आदी अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
जामखेड तालुक्यातील 100% आधार जोडणीचे काम करणारे बीएलओ खालीलप्रमाणे
बाळासाहेब रोडे,
निलेश बोराडे,
विकास हजारे,
संदीप घोडके,
बाबाजी राघू दातीर,
अविनाश पवार,
प्रभाकर होडशीळ,
रामचंद्र गाढवे,
अनिल कुलकर्णी,
गणेश कात्रजकर
कर्जत तालुक्यातील 100% आधार जोडणीचे काम करणारे बीएलओ खालीलप्रमाणे
सचिन झावरे,
सुनील टकले,
संतोष उंडे,
भारत भवर,
अनिलकुमार झगडे,
अमोल उधाने,
दिनकर जेवे,
रामचंद्र खोत,
अमित बिरादार,
रंगनाथ टकले,
ज्या बीएलओंनी शंभर टक्के आधार जोडणीचे काम केले आहे त्या सर्व बीएलओ यांचे फोटो ceo.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रकाशित करुन बीएलओंचाच सन्मान करण्यात येणार आहे. दरम्यान कर्जत-जामखेड मतदारसंघात आधार जोडणीचे काम सप्टेंबर अखेर पुर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील नागरिकांनी मतदानकार्ड सोबत आधार जोडणी तातडीने पुर्ण करून घ्यावी, असे अवाहन करण्यात आले आहे.