पिंपरखेडमध्ये 223 ग्रामस्थांनी घेतला आधार शिबिराचा लाभ – अमित देशमुख

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भारतीय डाक विभागाच्या वतीने पिंपरखेड गावामध्ये आधार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. या शिबीराचे उद्घाटन उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख यांच्या हस्ते पार पडले.

223 villagers benefited from Aadhaar camp in Pimperkhed - Amit Deshmukh

भारतीय डाक विभागाच्या वतीने पिंपरखेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आधार शिबिरात लहान मुलांचे आधार, नवीन आधार, आधार दुरुस्ती, मोबाईल व आधार जोडणी, अपघाती विमा, नवीन खाते अशा एकूण 223 ग्रामस्थांनी लाभ घेतला.

यावेळी पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र ओमासे व उपसरपंच अविनाश गायकवाड, बापूराव ढवळे, इसाक सय्यद,अंबर लबडे, बाळासाहेब कारंडे, सुर्यकांत कदम, प्रविण भापकर, दत्तात्रय आधुरे, धनराज भोसले, भारत ढवळे, भगवान ओमासे, विराज शेख, फयाज शेख, बाबासाहेब ढवळे आदी उपस्थित होते.

या शिबिरासाठी डाक विभागातील जगदिश पेंलेवाड, सुनिल धस, गणेश हजारे, संतोष औचरे, सारिका साळवे, सारिका मराठे, गणेश जगताप , ईश्वर बोथरे, छगन ढवळे, धनराज भोसले, परवीन पठाण यांचे सहकार्य लाभले.