राज्यात मंगळवारी आढळले 39 हजार कोरोना रूग्ण तर अहमदनगर जिल्ह्यात आढळले 1432 नवे रूग्ण

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. दररोज 35 हजाराहून अधिक रूग्ण राज्यात आढळून येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक वाढू लागला आहे. जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवाव्यात असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. (39 thousand corona patients were found in maharashtra on Tuesday while 1432 new patients were found in Ahmednagar district)

महाराष्ट्रात आज दिवसभरात 39 हजार 207 नवे रूग्ण आढळून आले आहेत तर अहमदनगर जिल्ह्यात 1432 नवे रूग्ण आढळून आले आहेत. राज्यातील सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता 2 लाख 67 हजार 659 इतकी झाली आहे.राज्यात ओमिक्रॉन थंडावला आहे. आज एकही रूग्ण आढळून आला नाही. राज्यातील सक्रीय ओमिक्रॉन बाधितांची संख्या 859 इतकी आहे.

राज्यात 53 कोरोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात आज 53 कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर दर 2 टक्के इतका आहे. आज दिवसभरात 38 हजार 824 कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के आहे.राज्यात 23 लाख 44 हजार 919 व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये आहेत तर 2960 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील सक्रीय रूग्णांची संख्या तीन लाखाच्या घरात आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सक्रीय रूग्णांची संख्या झाली 5 हजार 926

अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाने वेग पकडला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही अहमदनगर जिल्ह्यात कोरोना ठाण मांडून बसला होता. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रूग्ण वाढत आहेत. आज दिवसभरात 1432 नवे रूग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत. तर 244 जण बरे होऊन घरी परतले. जिल्‍ह्यातील सक्रीय रूग्णांची संख्या 5 हजार 926 इतकी झाली आहे.

जिल्हा रूग्णालयाच्या अहवालात 327 रूग्ण

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 86, अकाले 19, जामखेड 15,  कर्जत 19, कोपरगांव 01, नगर ग्रा. 26, नेवासा 12, पारनेर 42, पाथर्डी 13, राहुरी 08, संगमनेर 38, शेवगांव 03, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 18, कॅन्टोनमेंट बोर्ड 03, मिलिटरी हॉस्पिटल 05, इतर जिल्हा 13 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत आढळले 731 रूग्ण

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 300, अकोले 16, जामखेड 06, कर्जत 04, कोपरगाव 06,  नगर ग्रा. 56, नेवासा 21, पारनेर 61, पाथर्डी 19, राहाता 87, राहुरी 13, संगमनेर 06, शेवगाव 12, श्रीगोंदा 16, श्रीरामपूर 53, कॅन्टोन्मेंट बोर्ड 11, मिलिटरी हॉस्पिटल 13, इतर जिल्हा 29, इतर राज्यी 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आढळले 374 रूग्ण

अँटीजेन चाचणीत आज 374 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 136, अकोले 13, जामखेड 07, कर्जत 11, कोपरगाव 27, नगर ग्रा. 37, नेवासा 19, पारनेर 06, पाथर्डी 41, राहाता 26, राहुरी 09, संगमनेर 04, शेवगांव 12, श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 07, कॅन्टोन्मेंट बोर्ड 05, मिलिटरी हॉस्पिटल 02 आणि इतर जिल्हा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.

244 जण बरे होऊन घरी परतले

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 84, अकोले 12, जामखेड 01, कर्जत 03, कोपरगाव 19, नगर ग्रा 24, नेवासा 07, पारनेर 10, पाथर्डी 11, राहाता 10, राहुरी 06, संगमनेर 13, शेवगांव 01, श्रीगोंदा 07, श्रीरामपूर 12, कॅन्टोनमेंट बोर्ड 04, इतर जिल्हा 18 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.