जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या आमदार प्रा राम शिंदे यांनी पुन्हा एकदा भरघोस निधी मंजुर करून आणण्यात यश मिळवले आहे. आमदार राम शिंदे यांनी सुचवलेल्या 51 कामांना 5 कोटी रूपयांचा निधी नगरविकास विभागाकडून मंजुर झाला आहे. हा निधी मंजुर झाल्यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेपर्यंत विकासाची गंगा पोहचवण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे हे अहोरात्र कार्यरत आहेत. आमदारकी असो की मंत्रीपद या माध्यमांतून आमदार शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील विकास कामांसाठी करोडो रूपयांचा निधी खेचून आणत मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवला आहे. मध्यंतरी यात काही कारणाने खंड पडला होता. परंतू आता प्रा राम शिंदे हे विधानपरिषदेचे आमदार झाल्यापासून पुन्हा एकदा मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरू झाला आहे.
आमदार शिंदे यांनी मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी मैदानात उतरत करोडो रूपयांचा निधी खेचून आणण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे मतदारसंघातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लागत आहेत. आता नगरविकास विभागाकडून त्यांनी मतदारसंघातील गावांतर्गत मुलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी 5 कोटी रूपयांचा निधी खेचून आणला आहे. नगर विकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय 8 ऑगस्ट 2024 रोजी जारी केला आहे.
नगरविकास विभागाने आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून जामखेड तालुक्यातील 22 तर कर्जत तालुक्यातील 29 कामांना लेखाशिर्ष 2515 1238 मंजुरी दिली आहे. यासाठी 5 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. या निधीतून रस्ता क्राॅक्रीटीकरण, सभामंडप, तालीम, सिंगल फेज डिपी, सामाजिक सभागृह, वर्ग खोली बांधणे, शाळेसमोर क्राँक्रीटीकरण करणे, मंदिर परिसर सुशोभीकरण करणे, रस्ता खडीकरण, सार्वजनिक शौचालय व मुतारी बांधणे सह आदी कामे केली जाणार आहेत. गावांतर्गत मुलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी भरिव निधी मंजुर करून आणल्यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“कर्जत-जामखेड मतदारसंघात गावांतर्गत मुलभूत पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. सदरची कामे मार्गी लागावीत याकरिता माझा सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू असतो. महायुती सरकारने मतदारसंघात 51 ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामांसाठी 5 कोटींचा निधी मंजुर केला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व महायुती सरकारचे मनापासून आभार !”
जामखेड तालुक्यातील मंजुर कामे खालील प्रमाणे
अरणगाव येथे सामाजिक सभागृह बांधणे 25 लक्ष, रत्नापुर जि.प.शाळेच्या प्रांगणात काँक्रीटीकरण करणे 7 लक्ष, सरदवाडी येथील श्री राम मंदीर येथे काँक्रीटीकरण करणे 8 लक्ष, राजेवाडी येथील नागनाथ मंदीरासमोर सभामंडप बांधकाम करणे 10 लक्ष, कवडगाव येथील कवडगाव ते माळेवस्ती रस्ता सिमेट कॉक्रीटीकरण करणे 10 लक्ष, धानोरा – वंजारवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदीर परिसरात कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष, चोंडी येथील आनंदी आई दुध संघ ते जगदाळे वस्ती मुरमीकरण करणे 5 लक्ष, फक्राबाद येथील कुसडगाव रोड ते उबाळे वस्ती रस्ता मुरमीकरण करणे 10 लक्ष, खर्डा येथील कैकाडी जिरा ते स्मशानभुमी कडे जाणारा रस्ता कॉक्रीटीकरण करणे 10 लक्ष,भवरवाडी येथील काळुबाई मंदीर सभामंडप 10 लक्ष, पिंपळगाव उंडा येथील चनप्पा महाराज मंदिरा शेजारी सभा मंडप बांधणे 15 लक्ष, बोर्ले येथील मारुती मंदीर परिसरात काँक्रीटीकरण करणे 10 लक्ष रूपये.
बाळगव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ग्राऊंडमध्ये काँक्रिटीकरण करणे 5 लक्ष,तरडगाव – वंजारवाडी येथे नविन शाळा खोली – 1 10 लक्ष, वाकी येथील जि.प.प्रा.शाळा मैदानात काँक्रीटीकरण करणे 10 लक्ष, लोणी येथील परकड वस्ती येथे वस्ती अंतर्गत सिमेंट कॉक्रीटीकरण रस्ता 10 लक्ष, जायभायवाडी येथील जि.प.प्रा.शाळा जायभायवाडी वर्ग खोली 10 लक्ष,धामणगाव येथे गावाअंतर्गत रस्ता सिमेंट कॉक्रीटीकरण करणे 10 लक्ष, आनंदवाडी येथे जामखेड खर्डा रोड ते घुगे वस्ती रस्ता खडीकरण करणे 8 लक्ष, नाहुली येथे गाव अंतर्गत सिमेंट कॉक्रीटीकरण करने 10 लक्ष, तेलगंशी येथे गोसावी बाबा मठ सभामंडप 10 लक्ष, पाडळी येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदीर सभामंडप 10 लक्ष रूपये.
कर्जत तालुक्यातील मंजुर कामे खालील प्रमाणे
सुपेकरवाडी येथील बोराडे वस्ती सभामंडप बांधणे. 10 लक्ष दुरगाव येथे ग्रामपंचायत ते मराठी शाळा रस्ता सिमेंट कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष, धालवडी येथे पांडुरंग मंदिरासमोर कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष, बेलंवडी येथील मारुती मंदिरासमोर कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष, जळकेवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय ते मुळीक वस्ती रस्ता कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष, माही येथे जिल्हा परिषद शाळा कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष, सोनाळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेसमोर कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष, काळेवाडी येथे रावकाळे वस्ती रस्ता सिमेंट कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष, मिरजगाव येथे सार्वजनिक शौचालय व मुतारी बांधणे. 20 लक्ष रूपये.
बेर्डी येथे महादेव मंदिर समोर सभामंडप बांधणे. 10 लक्ष, करपडी येथे महादेव मंदिरासमोर कॉक्रीटीकरण करणे 9 लक्ष, खेड येथील गुप्तनाथ मंदिर परिसर सुशोभिकरण करणे 9 लक्ष, देशमुखवाडी येथील रवि दंडे वस्ती व्यायाम शाळा बांधणे. 10 लक्ष, चापडगाव येथील दत्त नगर 8 वी लाईन कॉक्रीटीकरणण करणे 9 लक्ष, चांदे बुद्रुक येथे महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लक्ष,नागलवाडी येथील नागेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष रूपये.
लोणी मसदपुर – हनुमान मंदिरा शेजारी सभामंडप 10 लक्ष, थेटेवाडी येथे तालीम बांधणे 10 लक्ष, भोसे येथील तलाठी कार्यालयासमोर रस्ता सिमेंट कॉक्रीटीकरण करणे 10 लक्ष, वायसेवाडी येथे खेड – राशीन रस्ता ते गावठाण मध्ये रस्ता सिमेंट कॉक्रीटीकरण करणे, आखोणी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सभामंडप बांधणे.(सायकर जाधव वस्ती) 10 लक्ष, मांदळी येथील भुजबळ, बचाटे वस्ती जालिंदरनाथ मंदिर सभामंडप बांधणे 10 लक्ष, सिद्धटेक येथील वडार वस्ती अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे 8 लक्ष, ताजू येथे बरकाडे वस्ती श्रीराम मंदिर सभामंडप बांधणे 10 लक्ष, शिंदा येथे गणपती मंदीर आंब्याचा मळा शिंदा येथे सभामंडप बांधणे 10 लक्ष, माळंगी येथे पिटेकर वस्ती सभामंडप बांधणे 10 लक्ष, करमनवाडी येथील लांबोरे वस्ती येथे सिंगल फेज डि.पी बसविणे 5 लक्ष, गोयकरवाडी येथे तुळजाभवानी मंदिरा समोर सभामंडप बांधणे 10 लक्ष, वालवड येथील कृष्णाप्पा मंदिरा समोर सभामंडप बांधणे 10 लक्ष रूपये.