Dr Shyamaprasad Mukherjee Jan-Van Vikas Yojana | कर्जत तालुक्यातील ६ गावांचा डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत समावेश
जामखेड टाईम्स वृत्तसेवा | ७ जानेवारी | राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखड्याअंतर्गत वने व वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्रालगतच्या गावामध्ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन ‘जन-वन विकास’ साधण्यासाठी शासनाने ‘ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास’ योजना (Dr Shyamaprasad Mukherjee Jan-Van Vikas Yojana ) सुरु केली आहे. या योजनेसाठी कर्जत तालुक्यामधील ६ गावांची पुणे वन्यजीव विभागांतर्गत निवड करण्यात आली आहे.
कर्जत जामखेडचे आ रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी वेळोवेळी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी या योजनेत आपल्या मतदारसंघातील गावांचा समावेश व्हावा यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. त्यानुसार मतदारसंघातील ६ गावांचा समावेश करण्यात आला असून प्रत्येक गावासाठी २५ लाख रुपयांचा निधी या योजनेंतर्गत मंजूर झाला आहे.
कर्जत (karjat ) तालुक्यासाठी एकूण दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासह अजून ४ गावांचा या योजनेत समाविष्ट करण्यात यावी यासाठी आ रोहित पवार प्रयत्नशील आहेत. त्यासंदर्भातील प्रस्तावही रेहेकुरी वन्यजीव कार्यालय (Rehekuri Wildlife Office) व पुणे वन्यजीव विभाग (Pune Wildlife Department) यांच्यातर्फे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याबाबत ग्रामस्थांनी आ पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेचा गावकऱ्यांची वनावरील निर्भरता कमी करून शेतीला पूरक असे जोडधंदे निर्माण करणे तसेच मानव व वन्य प्राण्यांतील संघर्ष कमी करणे, वन व वन्य जीवांचे संरक्षण करणे हा मूळ उद्देश आहे. या योजनेत कर्जत तालुक्यातील गावांचा समावेश झाल्यामुळे आता तालुक्यातील वन व्यवस्थापनाचा दर्जा तर उंचावेल शिवाय पर्यायी रोजगार देखील उपलब्ध होण्यास मदत होईल.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास’ योजना (Dr Shyamaprasad Mukherjee Jan-Van Vikas Yojana ) सुरु केली आहे. या योजनेसाठी कर्जत तालुक्यामधील ६ गावांची पुणे वन्यजीव विभागांतर्गत निवड करण्यात आली आहे. यामध्ये बिटकेवाडी, चखालेवाडी, कोंभळी, खांडवी, थेरगाव चांदे खुर्द, म्हाळंगी या गावांचा समावेश आहे.