कर्जत नगरपंचायत निवडणुकीत दुपारी दीड वाजेपर्यंत 60 टक्के मतदान | 60 Percent turnout in Karjat Nagar Panchayat elections till 1.30 pm
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । कर्जत नगरपंचायतच्या दुसर्या टप्प्यातील 4 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळपासून मतदानासाठी मतदारांनी मोठा उत्साह दाखवला. दुपारी दीड वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झाले होते. (60 Percent Turnout In Karjat Nagar Panchayat Elections Till 1.30 Pm)
कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे या दोन नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान कर्जत नगरपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा अनेक अर्थाने वादग्रस्त ठरला होता. आरोप प्रत्यारोपाच्या फैरीने कर्जतचे राजकीय वातावरण चांगलेच स्फोटक बनले होते. परंतू दुसर्या टप्प्यातील प्रचार वादग्रस्त ठरला नाही. पवार व शिंदे यांनी उणीदुणी न काढत प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला.
- Karjat Jamkhed News: हळगाव साखर कारखान्याच्या कृषी अधिकाऱ्यावर मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल, नान्नजमधील सजग नागरिकांनी केला रोहित पवारांच्या धनशक्तीचा भांडाफोड !
- आमदार प्रा राम शिंदे यांना निवडणूक लढवण्यासाठी उद्योजक लालासाहेब उबाळे यांच्याकडून 1 लाख रूपयांची आर्थिक मदत
- Karjat Jamkhed News : आमदार राम शिंदेंनी गाजवले कर्जतचे मैदान, सांगता सभेत शरद पवार व रोहित पवारांचा जोरदार समाचार, वाचा राम शिंदेंच्या भाषणातील सर्व मुद्दे
- Ram Shinde News : मी सांगतो, तुमचा ऊस नाही गेला तर त्याच्या बापात फरक – आमदार प्रा.राम शिंदे
- Karjat Jamkhed News: राष्ट्रवादीला भगदाड : दिघोळ सोसायटीच्या चेअरमनसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !
आज कर्जत नगरपंचायत निवडणूकीच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. सकाळपासून मतदारांनी मोठा उत्साह दाखवला. चारही प्रभागात चुरशीचे मतदान होत आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत शांततेच्या वातावरणात मतदान पार पडले. सध्या 60 टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील चार जागांवर विक्रमी मतदान होण्याची शक्यता दिसत आहे.