जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । मी पडलो जरी असलो तरी पुन्हा आमदार झालोय, त्यामुळं अजून कामं सांगा, अजून मी कामं करेल, मंत्रीमंडळ विस्तार झाला की तुमच्या मनातील सगळ्या गोष्टी पुर्ण होतील, जे होत नाही, जे नियमात बसत नाही, ते करणं हा माझा छंद आहे. म्हणूनच तुकाई केली. तुकाई नियमातही बसत नव्हती आणि कायद्यातही बसत नव्हती पण केली. आपल्या पाच सहा गावांचा पाण्याचा प्रश्न माझ्या ध्यानात आहे. तो मीच सोडवणार आहे, असे प्रतिपादन आमदार प्रा.राम शिंदे यांनी केले.
रामनवमी निमित्त कर्जत तालुक्यातील भोसे गावात आयोजित यात्रोत्सवाला आमदार प्रा राम शिंदे यांनी भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांचे जंगी स्वागत केले. कुस्ती मैदानाला भेट दिल्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने पीएसआय अतुल क्षीरसागर यांनी आमदार प्रा राम शिंदे यांचा सन्मान केला.
यात्रोत्सवानिमित्त आयोजित जंगी कुस्त्यांच्या मैदानात आमदार प्रा राम शिंदे यांच्या हस्ते मानाच्या कुस्त्या लावण्यात आल्या. यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते महिला कुस्तीपट्टूंचा सन्मान करण्यात आला. कुस्त्या पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी झाली होती.
यावेळी पुढे बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, भोसे हे तालुक्यातील शेवटच्या टोकाचं गाव आहे. शेवटच्या गावाकडे जेव्हा केव्हा कोणी लक्ष देत नव्हतं तेव्हा मी लक्ष दिलं, पहिल्यांदा आमदार झाल्याच्या दिवसापासून या गावावर माझे प्रेम केले. गावानेही माझ्यावर भरभरून प्रेम केले. म्हणूनच भोसे गावात आल्याच्यानंतर घरी आल्याची भावना निर्माण होते, असे आमदार प्रा.राम शिंदे यावेळी म्हणाले.
यावेळी प्रदीप खराडे, योगेश खराडे, राहुल खराडे, नाना क्षीरसागर, हरिश्चन्द्र खराडे, सुरेश चव्हाण, शरद खराडे, दादासाहेब खराडे, वसंत क्षीरसागर, अविनाश चव्हाण, तानाजी थोरात, उद्धव खराडे, नीलकंठ खराडे,लखन खराडे, किरण पोतखुले, कालिदास खराडे, सुभाष खराडे सर, शहाजी खराडे, पांडुरंग क्षीरसागर, नरसिंग खराडे, लखन खराडे, मालिदास खराडे, चाँदभाई शेख,पोलिस पाटील मधुकर चव्हाण, अशोक मल्हारी खराडे, रामेश्वर खराडे, प्रविण चव्हाण, देविदास क्षीरसागर,रामा ढोले, भाऊसाहेब राऊत, विश्वनाथ शिंदे, मयूर साळुंके, सतीश खराडे, स्वप्नील खराडे,संदीप चव्हाण, पै.भाऊ खराडे, सुभाष खराडे, संजय खराडे, पै.बाबा खराडे, परशुराम क्षीरसागर, राजेंद्र क्षीरसागर, बिभीषण क्षीरसागर, सुनील ढोले, रमेश राऊत, बाळासाहेब क्षीरसागर, शंकर नवनाथ खराडे, सह आदी उपस्थित होते.