दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने अहमदनगर जिल्हा हादरला, नवर्‍याने बायकोसह सासूची केली हत्या, राहुरीच्या कात्रड गावातील घटना

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यात दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून नवर्‍याने आपल्या बायकोसह सासूची हत्या केली आहे. ही खळबळजनक घटना राहुरी तालुक्यातून समोर आली आहे. लोखंडी राॅडच्या डोक्यात प्रहार दोघींची हत्या करण्यात आली. ही घटना समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे.

Ahmadnagar district shaken by double murder, husband kills mother-in-law along with wife, incident in Katrad village of Rahuri,Nutan Sagar Sable Surekha Dilip Dangat Murder Case,

राहुरी तालुक्यातील कात्रड गावात मंगळवारी मध्यरात्री सागर सुरेश साबळे याने पत्नी नुतन सागर साबळे (वय 27) व सासू सुरेखा दिलीप दांगट (वय 45) या दोघी झोपेत असतानाच त्यांची हत्या केली. दोघींच्या डोक्यात त्याने लोखंडी रॉडने (पहार) हल्ला करत हत्या करण्यात आली. घटनेनंतर आरोपी सागर साबळे हा फरार झाला आहे. कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड झाल्याचे बोलले जात आहे.

राहूरीच्या कात्रड गावात पतीने बायकोसह सासूची हत्या केल्याची बातमी समोर येताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

दरम्यान, घरात दोघींचे मृतदेह आढळून येताच आरोपीच्या भावाने सदर घटनेची माहिती राहूरी पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.