खळबळजनक : महार वतन हाडोळा इनाम जमिन खरेदी विक्री प्रकरणात सहा शासकीय अधिकाऱ्यांसह एकुण 38 जणांविरोधात एसीबीने दाखल केले गुन्हे, अहमदनगरसह महाराष्ट्रात उडाली मोठी खळबळ | Ahmednagar ACB News
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महार वतन हाडोळा इनाम जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून सदर जमिनीची खरेदी विक्री केल्याप्रकरणी अहमदनगरचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, सहाय्यक दुय्यम निबंधक, मंडलाधिकारी तलाठ्यासह एकुण 38 जणांविरोधात एसीबीने गुन्हे दाखल केल्याने अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. (Ahmednagar ACB News)
अहमदनगर तालुक्यातील वडगांव गुप्ता येथील गट नं.२०३ क्षेत्र २ हेक्टर, ९७ आर पोट खराबा ०.०९ आर. गट नं.२०५ एकुण क्षेत्र १ हेक्टर ३४ आर ही कनिष्ट महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ब या जमिनीचे खोटे कागदपत्रे तयार करून या जमिनीची खरेदी विक्री करण्यात आली होती. हे प्रकरण दि.३/१/२००६ रोजीचे पूर्वी ते दि.६/१/२००६ रोजी याकाळात घडले होते. या प्रकरणाचा एसीबीने तपास करत 6 शासकीय अधिकारी व कर्मचारी व 32 खाजगी व्यक्ती अश्या 38 जणांविरोधात एम.आय.डी.सी. पो.स्टे., जि.अहमदनगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम १३(१)(ड) सह १३(२) सह भा.दं.वि. क.१६७ ४२० १०९ प्रमाणे दि.१९/०७/२०२३ रोजी गुन्हा दाखल केला. एसीबीच्या या कारवाईने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे की, मौजे वडगांव गुप्ता शिवारातील गट नं.२०३ क्षेत्र २ हेक्टर, ९७ आर पोट खराबा ०.०९ आर. गट नं.२०५ एकुण क्षेत्र १ हेक्टर ३४ आर ही कनिष्ट महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ब ची जमिन जुन्या शर्तीवर करणेसाठी अटी व शर्तीवर तत्कालीन तहसिलदार अहमदनगर यांनी बेकायदेशीर परवानगी दिली होती. तत्कालीन तहसिलदार एल. एन. पाटिल यांनी काढलेल्या आदेशास तत्कालीन वडगावगुप्ताचे तलाठी एल. एस. रोहकले, नालेगाव मंडलाधिकारी दुर्गे यांनी मदत केली होती व खरेदी विक्री व्यवहाराच्या नियमबाहय फेरफार- नोंदी घेवुन खाजगी इसम उत्कर्ष पाटिल व अजित लुकड यांना मदत केली आहे.
तसेच तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अहमदनगर व्ही. टी. जरे व तत्कालीन उपविभागीय अधिकारी नगर भाग राजेंद्र मुठे याना सदरचा आदेश बेकायदेशीर असल्याची माहिती असुन देखील त्यांनी कुठलीही कारवाई न करता, बेकायदेशीर व्यवहारात सहभागी होवुन सदर व्यवहारास एक प्रकारे प्रोत्साहन दिले आहे असे दिसुन येत आहे.
तत्कालीन सह दुय्यम निबंधक, अहमदनगर- २ दिलीप बबन निराली यांनी खरेदी विक्रीचे बेकायदेशीरपणे दस्त नोंदविले आहे. तसेच नमुद जमिनीचे भोगवटादार दिनकर आनंदा शिंदे, विनायक शंकर शिंदे, बाबु आनंदराव शिंदे, मोहन आनंदराव शिंदे, वामन किसन शिंदे, यादव किसन शिंदे, सदाशिव केशव शिंदे, रामभाऊ केशव शिंदे, सुनिल केशव शिंदे, यादव केशव शिंदे, श्रीमती मालनबाई केशव शिंदे, श्रीमती लता शांतवण भाकरे, अरुण दगडु शिंदे, शालनबाई दगडु शिंदे, लक्ष्मण रामचंद्र शिंदे, मथुरा विष्णु शिंदे, संदिप विष्णु शिंदे, सुनिता रतन गायकवाड, नंदा शाम घाटविसावे, शालुबाई शाहुराव प्रभुणे,मच्छिंद्र आनंदाव शिंदे, लिलाबाई चंद्रभान पाडळे, शोभा बुध्दीराम ठाकुर, तसेच संमती देणार वत्सलाबाई तुकाराम पाचारणे, सुशिला शांतवण घाटविसावे, तुळसाबाई मारुती नरवडे, छबुबाई भिवाजी साळवे, इंद्रायणी विठठल जाधव, वत्सला वामन जाधव, कौसल्या दामु जगताप यांचे जनरल मुखत्यार उत्कर्ष सुरेश पाटील, रा. श्रमिकनगर आनंदऋषीजी मार्ग अहमदनगर व जमिन खरेदी करणारे अजित कचरदास लुंकड, रा. आनंद दर्शन अपार्टमेंट, मार्केट यार्ड, अहमदनगर यांना सदरची जमिन हि महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ ची जमिन असल्याचे माहित असुन देखील त्यांनी वरिल नमुद तहसिलदार यांना सदर जमिन जुन्या शर्तीवर करणेसाठी अटी व शर्तीवर परवानगी देण्यासाठी मदत करुन, खोटे कागदपत्र तयार करून, सदर जमिनीची खरेदी विक्री व्यवहार करुन दस्त नोंदणी करुन ७/१२ उताऱ्यावर व फेरफार नोंदी घेतलेल्या आहेत व दस्त तयार करून शासनाची फसवणुक केली आहे.
सदर बाबत एम.आय.डी.सी. पो.स्टे., जि.अहमदनगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम १३(१)(ड) सह १३(२) सह भा.दं.वि. क.१६७ ४२० १०९ प्रमाणे दि.१९/०७/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप अधीक्षक श्री प्रविण लोखंडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर हे करीत आहेत.
शासनाची फसवणूक करणाऱ्या 6 शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल
१ ) एल. एन. पाटिल, तत्कालीन तहसिलदार अहमदनगर (L. N. Patil, then Tehsildar Ahmednagar)
२) एल. एस. रोहकले, तत्कालीन तलाठी, वडगांवगुप्ता, ता. जि. अहमदनगर (L.S.Rohkale, then Talathi, Vadgaongupta,Ahmednagar)
३) दुर्गे, तत्कालीन मंडळ अधिकारी, नालेगांव, ता. जि. अहमदनगर (Durge, then mandal Adhikari, Nalegaon, Tt. Dist. Ahmednagar)
४) व्ही. टी. जरे, तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अहमदनगर (V. T. Jare, then Additional Collector Ahmednagar)
५) राजेंद्र मुठे, तत्कालीन उपविभागीय अधिकारी नगर भाग (Rajendra Muthe, then Sub Divisional Officer Nagar)
६) दिलीप बबन निराली, तत्कालीन सह दुय्यम निबंधक, अहमदनगर-२ (Dilip Baban Nirali, then Joint Sub-Registrar, Ahmednagar-2)
जमिनीचे भोगवटादारांवर गुन्हे दाखल
७) दिनकर आनंदा शिंदे, ८) विनायक शंकर शिंदे, ९) बाबु आनंदराव शिंदे, १०) मोहन आनंदराव शिंदे, ११) वामन किसन शिंदे, १२) यादव किसन शिंदे, १३) सदाशिव केशव शिंदे, १४) रामभाऊ केशव शिंदे, १५) सुनिल केशव शिंदे, १६) यादव केशव शिंदे, १७) श्रीमती मालनबाई केशव शिंदे, १८) श्रीमती लता शांतवण भाकरे, १८)अरुण दगडु शिंदे, २०) शालनबाई दगडु शिंदे, २१) लक्ष्मण रामचंद्र शिंदे, २२) मथुरा विष्णु शिंदे, २३) संदिप विष्णु शिंदे २४) सुनिता रतन गायकवाड, २५) नंदा शाम घाटविसावे, २६) शालुबाई शाहुराव प्रभुणे, २७) मच्छिंद्र आनंदाव शिंदे, २८) लिलाबाई चंद्रभान पाडळे, २९ ) शोभा बुध्दीराम ठाकुर, तसेच संमती देणार ३० ) वत्सलाबाई तुकाराम पाचारणे, ३१) सुशिला शांतवण घाटविसावे ३२) तुळसाबाई मारुती नरवडे, ३३)छबुबाई भिवाजी साळवे, ३४) इंद्रायणी विठठल जाधव, ३५) वत्सला वामन जाधव, ३६) कौसल्या दामु जगताप यांचे जनरल मुखत्यार ३७) उत्कर्ष सुरेश पाटील, रा. श्रमिकनगर आनंदऋषीजी मार्ग अहमदनगर (Utkarsh Suresh Patil, Res. Shramik Nagar Anandrishiji Marg Ahmednagar)
जमिन खरेदी करणाऱ्यावर गुन्हे दाखल
३८ ) अजित कचरदास लुंकड, रा. आनंद दर्शन अपार्टमेंट, मार्केट यार्ड, अहमदनगर (Ajit Kachardas Lunkad, Res. Anand Darshan Apartment, Market Yard, Ahmednagar)
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेडडी, वाचक पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगरकडील पोलीस उप अधीक्षक प्रविण लोखंडे, पोलीस निरीक्षक राजु आल्हाट, पोहेकॉ संतोष शिंदे, पोकों, रविंद्र निमसे, पोना विजय गंगुल यांचे पथकाने केली आहे.
महार वतन हाडोळा इनाम जमिन खरेदी विक्री प्रकरणी 38 जणांविरोधात गुन्हे दाखल, आरोपींमध्ये सहा अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश अहमदनगर एसीबीची धडक कारवाई, राज्यात उडाली मोठी खळबळ