ahmednagar lockdown news today | लाॅकडाऊनचे संकट पुन्हा घोंगावू लागले ;अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावे लाॅकडाऊन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ahmednagar lockdown news today | अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे  जिल्ह्यावर पुन्हा एकदा लाॅकडाऊनचे संकट घोंगावू लागले आहे. जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील 61 गावे लाॅकडाऊन करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डाॅ राजेंद्र भोसले यांनी रविवारी काढले आहेत. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. (Collector Dr. Rajendra Bhosale orders lockdown of 61 villages in Ahmednagar district)

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट सक्रीय झाल्याचीही भीती व्यक्त केली जात होती. अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील काही गावांमध्ये गेल्या दिवसांपासून कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट सक्रीय होऊन नये याकरिता जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर उपाययोजना हाती घेण्यात सुरूवात केली आहे.

⬇️ ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2021
https://amzn.to/2Yh5sGo

रविवारी जिल्हाधिकारी डाॅ राजेंद्र भोसले यांनी अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 61 गावे लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. It has decided to lock down 61 villages in 11 talukas of Ahmednagar district.तसा आदेश काढण्यात आला आहे. अहमदनगर जिल्हयामध्ये दैनंदीनरित्या 500 ते 800 दरम्यान कोरोना बाधीत रुग्ण संख्या आढळून येत आहे. तसेच जिल्हयाचा पॉझिटीव्हीटी रेट हा 5 टक्के पेक्षा जास्त आहे.

अहमदनगर जिल्हयातील 10 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधीत रुग्णसंख्या असणा-या खालील तालूक्यातील गावांमध्ये अत्यावश्यक सेवा दवाखाने, मेडीकल, टेस्टिंग सेंटर इ. वगळता इतर सर्व आस्थापना दुकाने, वस्तु विक्री सेवा दिनांक 04/10/2021 रोजी 00.01 वाजेपासून दिनांक 13/10/2021 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या गावांमध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई राहिल.

अहमदनगर – खालील तालुक्यातील गावांमध्ये लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

1) अकोले – लिंगदेव, विरगाव, परखतपूर

2) कर्जत – खांडवी, बाभूळगाव दुमाला

3) नेवासा – कुकाणा

4) कोपरगाव – गोधेगाव

5) पारनेर – वडनेर बु. कान्हुरपठार, गोरेगाव, दैठणेगुंजाळ, जामगाव, भाळवणी

6) पाथर्डी – तिसगाव

7) राहता – भगवतीपूर, पिंप्री निर्मळ, अस्तगाव, को-हाळे, लोणी बु., लोणी खु, कोल्हार बु.

8) संगमनेर – गुंजाळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्वी बु., आश्वी खु., पारेगाव बु., पानोडी, शिबलापूर, बोटा, उंबरी, पिंपरणे, वेल्हाळे, खळी, देवगाव घुलेवाडी, कोल्हेवाडी, वडगाव लांडगा, तळेगाव, घारगाव, चंदनापूरी, कनोली, निर्माण, वडगाव पान, सायखींडी

9) शेवगाव – भातकुडगाव, घोटण, दहीगावने, आव्हाणे बु.

10) श्रीगोंदा – लोणी व्यंकनाथ, घारगाव, बेलवंडी, मढेवडगाव शेडगाव, येळपणे, कौठा, कोळगाव, काष्टी

11) श्रीरामपूर – बेलापूर खु., उक्कलगाव, कारेगाव