ahmednagar lockdown news today | जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील 61 गावांमध्ये आजपासून पुढील दहा दिवस कडक लाॅकडाऊन असणार आहे. या लाॅकडाऊनच्या कडक अंमलबजावणीस जिल्ह्यात सुरूवात झाली आहे. (Strict implementation of lockdown continues in 61 villages of Ahmednagar district)
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 61 गावांमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रविवारी लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला होता.
आज सोमवारपासून 61 गावांमध्ये कोरोना आटोक्यात आणण्यासाठीच्या कठोर उपाययोजना हाती घेण्यात सुरूवात झाली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले आहेत. पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील खालील 61 गावांमध्ये लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. या लाॅकडाऊनमध्ये संगमनेर तालुक्यात सर्वाधिक गावांचा समावेश आहे.
1) अकोले – लिंगदेव, विरगाव, परखतपूर
2) कर्जत – खांडवी, बाभूळगाव दुमाला
3) नेवासा – कुकाणा
4) कोपरगाव – गोधेगाव
5) पारनेर – वडनेर बु. कान्हुरपठार, गोरेगाव, दैठणेगुंजाळ, जामगाव, भाळवणी
6) पाथर्डी – तिसगाव
7) राहता – भगवतीपूर, पिंप्री निर्मळ, अस्तगाव, को-हाळे, लोणी बु., लोणी खु, कोल्हार बु.
8) संगमनेर – गुंजाळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्वी बु., आश्वी खु., पारेगाव बु., पानोडी, शिबलापूर, बोटा, उंबरी, पिंपरणे, वेल्हाळे, खळी, देवगाव घुलेवाडी, कोल्हेवाडी, वडगाव लांडगा, तळेगाव, घारगाव, चंदनापूरी, कनोली, निर्माण, वडगाव पान, सायखींडी
9) शेवगाव – भातकुडगाव, घोटण, दहीगावने, आव्हाणे बु.
10) श्रीगोंदा – लोणी व्यंकनाथ, घारगाव, बेलवंडी, मढेवडगाव शेडगाव, येळपणे, कौठा, कोळगाव, काष्टी
11) श्रीरामपूर – बेलापूर खु., उक्कलगाव, कारेगाव
web titel : ahmednagar lockdown news today | Strict implementation of lockdown continues in 61 villages of Ahmednagar district