अहमदनगर: फेसबुक, इंस्टाग्राम, वाॅटसअपवर पोलिसांची करडी नजर, सोशल मीडियावरील ‘ते’ तरूण पोलिसांच्या रडारवर – जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यात मागील काही दिवसांपासून समाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न वाढले आहेत. यामुळे सामाजिक वातावरण दुषित होऊ लागले आहे, अश्या पार्श्वभूमीवर राज्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्याची पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला ( Rakesh Ola ips) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. सोशल मीडियावर पोलिसांसह गुप्तचर विभागाकडून करडी नजर ठेवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वादग्रस्त पोस्ट करणारांची आता काय खैर नसणार आहे.सोशल मीडियावर वादग्रस्त लिखाण करणारांविरोधात अहमदनगर पोलिसांनी कारवाई हाती घेतली आहे.पोलिसांचा सोशल मीडियावर कडक वाॅच सुरू झाला आहे.
सोशल मीडियाद्वारे वादग्रस्त पोस्ट करू नका
वाॅटसअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, या सोशल मीडिया साईटवर जातीय तेढ निर्माण होईल असे वादग्रस्त लिखाण करू नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका, कोणत्याही जाती / धर्माच्या भावना दुखावतील असे पोस्टर, फोटो, व्हिडीओ टाकू नका, अश्या प्रकारच्या कृत्यांवर पोलिसांची करडी नजर असून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अहमदनगर जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला (Rakesh Ola ips) यांनी दिला आहे.