क्रुरतेचा कळस : मद्यधुंद पतीने पत्नी आणि दोन मुलींना जिवंत जाळले, पिंपळगाव लांडगा गावात तिहेरी हत्याकांड, अहमदनगर जिल्ह्यात उडाली मोठी खळबळ !
Ahmednagar Pimpalgaon Landga Murder Today : अहमदनगर जिल्ह्यातून तिहेरी हत्याकांडाची एक घटना समोर आली आहे.या घटनेत दारूड्या नवर्याने पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.ही घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा (Pimpalgaon Landaga nagar Taluka ) या गावात घडली आहे. क्रुरतेचा कळस गाठणाऱ्या या घटनेने संपुर्ण अहमदनगर जिल्हा हादरून गेला आहे. धक्कादायक म्हणजे घटनेनंतर आरोपी हा एका झाडाखाली निवांत बसला होता. (Pimpalgaon Landaga murder news today)
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडगाव लांडगा इथल्या सुनील लांडगे (Sunil Landage) याने त्याची 26 वर्षीय पत्नी लिलाबाई, मुलगी साक्षी आणि खुशी यांना घरात जिवंत जाळले. नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील लिलाबाई लांडगे (Lilabai Landage) आणि त्यांच्या दोन मुली घरात असताना आरोपी सुनील लांडगे याने अंगावर रॉकेल ओतून त्यांना जिवंत जाळल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. (Pimpalgaon Landga news)
संशयाचं भूत डोक्यात घुसल्याने आरोपीने पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळले. तिघींना जिवंत जाळल्यानंतर आरोपी सुनिल लांडगे हा दारुच्या नशेत घरासमोर असलेल्या एका झाडाखाली निवांत बसला होता. मी पत्नीला जाळत असताना पत्नी माझ्या पाया पडत होती असंही तौ बडबडत होता. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल असून पंचनामा करत आहेत. (Pimpalgaon Landga Murder news)
पिंपळगाव लांडगा येथे सुनील लांडगे या तरुणाने दारूच्या नशेत असतानी सोमवारी सकाळी नऊ वाजता पत्नी आणि दोन मुलींना जिवंत जाळले. पत्नी लिलाबाई लांडगे (वय 26 वर्ष), मुलगी साक्षी लांडगे (वय 14 वर्षे) व खुशी लांडगे नऊ महिने यांना जिवंत जाळल्यात आले. या घटनेत पत्र्याची खोलीसुद्धा जळून खाक झाली. पोलिसांनी तिघींचे मृतदेह बाहेर काढले आहेत. (Pimpalgaon Landga Murder news today)
नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा गावातील सुनिल लांडगे याने क्रुरतेचा कळस गाठत पत्नीसह दोन चिमुकल्या मुलींना जिवंत जाळले. तिहेरी हत्याकांडाच्या घटनेमुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.सोमवारी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळल्यानंतर सुनिल लांडगे हा घरासमोर असलेल्या अंगणातील झाडाखाली निवांत बसला होता. (पिंपळगाव लांडगा news today)