Allow cannabis cultivation | जिल्हाधिकारी साहेब गांजा लागवडीची परवानगी द्या; शेतकऱ्याच्या मागणीने जिल्हा प्रशासन हादरले

आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाने उचलले हे पाऊल

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | Allow cannabis cultivation| आर्थिकदृष्ट्या बक्कळ पैसा मिळवून देणारे गांजा हे पिक आहे. त्यामुळेच गांजा लागवड करण्यास कायदेशीर परवानगी मिळावी अशी मागणी सातत्याने होत असते. परंतु महाराष्ट्रात गांजा लागवडीस कायदेशीर परवानगी नाही. तरीही चोरट्या मार्गाने गांजा लागवड होत असल्याच्या घटना अनेकदा राज्यात उघडकीस येतात. आता तर एका शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत गांजा लागवडीची परवानगीच मागितल्याने प्रशासकीय यंत्रणा चक्रावून गेल्या आहेत.

ही घटना सोलापुर जिल्ह्यातून समोर आली आहे.गांजा लागवडीची परवानगी द्यावी (Allow cannabis cultivation) अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील शिरापूर (ता मोहळ) येथील अनिल आबाजी पाटील (Anil Abaji Patil from Shirapur Ta Mohal in Solapur district) या शेतकऱ्याने केली आहे. पाटील यांच्या या मागणीमुळे सोलापूर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

मोहळ तालुक्यातील शेतकरी अनिल पाटील यांनी अश्याप्रकारे का मागणी केली असेल ? हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतानाच आता यामागचे खरे कारण समोर आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना लिहलेल्या पत्रात पाटील म्हणतात, “मी शेतकरी असून कोणतेही पिक केले तरी त्याला शासनाचा हमी भाव नसल्यामुळे शेती तोट्यात करावी लागत आहे. शेतीमालाला कवीडमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही. तसेच एखाद्या साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला असता त्याचे देखील बिल लवकर मिळत नाही.” अशी कैफियत मांडत पाटील यांनी शेतकऱ्यांचा महत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. Allow cannabis cultivation

शेती व्यवसाय सातत्याने तोट्यात जात असल्याने राज्यातील बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात आहे. शेती प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अंदोलने होतात अश्वासने मिळतात परंतु ठोस कृतीकार्यक्रमांची अंमलबजावणी अभावानेच होते. आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी घेतलेला निर्णय जरी टोकाचा असला तरी आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीची ही कहाणी सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.

मोहळ तालुक्यातील शेतकरी पाटील यांनी प्रशासनाला १५ सप्टेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. १५ तारखेपर्यंत प्रशासनाने गांजा लागवडीची परवानगी द्यावी (Allow cannabis cultivation) अन्यथा १६ सप्टेंबर रोजी प्रशासनाकडून परवानगी मिळाली असे गृहित धरुन मी गांजा लागवड सुरु करणार आहे व माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यास आपले प्रशासन जबाबदार राहील असा थेट इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

Allow cannabis cultivation
Allow cannabis cultivation Demand from Solapur farmers