Karve Nagar News : तीन मुलींसमोर बापाला संपवले, अनैतिक संबंधात अडथळा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले,कर्वेनगर परिसरात मध्यरात्री रंगला खुनाचा थरार
Karve Nagar News : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यातील कर्वेनगर भागात मध्यरात्री एका इमारतीत घुसून एकाची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे तीन मुलींच्या समोरच बापाला संपविण्यात आले.अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या नवर्याचा प्रियकराकडून पत्नीनेच काटा काढल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.
कर्वेनगर परिसरातील उच्चभ्रु श्रीमान सोसायटीत अमोल पंढरीनाथ निवगुणे (वय ४२) हे आपल्या कुटुंबासह राहतात. मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा कोणीतरी वाजवला. त्यावेळी अमोल यांनी दरवाजा उघडताच आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
अचानक झालेल्या या प्राणघातक हल्लानंतर अमोल यांनी आरडाओरड केली असता त्यांच्या तीन मुली व पत्नी धावत आल्या. तोवर हल्लेखोर तेथून पसार झाले होते. यावेळी हल्लेखोरांनी घरातील सोने, दागिणे व पैसे व घरातील किमती वस्तू घेऊन पसार झाले होते. सदरचा प्रकार हा चोरी करण्याच्या उद्देशाने झाला असावा असा कसाय बांधला जात होता.
दरम्यान, मध्यरात्री झालेल्या प्राणघातक हल्ल्यात अमोल पंढरीनाथ निवंगुने यांचा मृत्यू झाला. मयत अमोल हे खाजगी वाहनावर चालक म्हणून कामास होते. दरम्यान त्यांच्या तीन मुलींसमोरच त्यांची हत्या करण्यात आल्याने त्या प्रचंड भयभीत झाल्या होत्या.मुलींच्या मनावर या घटनेमुळे मोठा परिणाम झाला आहे.हल्लेखोरांनी आपल्या तोंडावर काळे कापड बांधले होते.हल्लेखोर समोर असूनही त्यांचे चेहरे त्यांना ओळखता आले नाहीत.
सदर घटना चोरीच्या उद्देशाने करण्यात आली असावी असा संशय व्यक्त केला जात होता परंतू पोलिसांनी सदर घटनेचा कसून तपास केला असता अमोल निवगुणे यांच्या हत्येत त्याच्या पत्नीचाच सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. अमोल यांच्या पत्नीने आपल्या प्रियकराकडून ही हत्या घडवून आणली.
अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अमोलचा खून करण्यात आला असे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींनी या आधीही दोनदा अमोलच्या हत्येचा प्रयत्न केला होता, परंतु तो फसला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली.