पिंपरखेड सोसायटीवर अंकुश ढवळे गटाचा कब्जा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। खासदार सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या माजी उपसभापती अंकुशराव ढवळे यांच्या पॅनलचा पिंपरखेड सेवा संस्थेच्या निवडणुकीमध्ये दणदणीत विजय झाला आहे. अंकुशराव ढवळे यांच्या गटाने 13 जागा जिंकत सोसायटीवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आणि सत्ता कायम राखली. (Ankush Dhawale group captures Pimparkhed society)

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या पिंपरखेड सेवा संस्थेची निवडणूक अतिशय चुरशीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी परिवर्तन पॅनल विरुद्ध जनसेवा शेतकरी विकास पॅनल असा थेट सामना झाला. या निवडणुकीसाठी 90 टक्के मतदान झाले होते.

मतदानानंतर लगेचच मतमोजणी सुरू करण्यात आली होती सायंकाळी हाती आलेल्या निकालानुसार माजी उपसभापती अंकुशव ढवळे यांच्या गटाने सर्वच्या सर्व 13 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत सरपंच बापूराव ढवळे यांच्यासह त्यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला.

विजय झालेले उमेदवार खालील प्रमाणे

  1. पांडुरंग विठ्ठल ढवळे – 445
  2. भगवान आप्पा ओमासे – 443
  3. आनंदराव भााकर – 434
  4. दगडू अंबादास कदम – 431
  5. शिवाजी मथुरादास ढवळे – 431
  6. मोहन रंगनाथ शिंदे – 415
  7. रहेमान मेहबूब शेख – 414
  8. दगडू अंबादास कदम – 434
  9. दगडाबाई नवनाथ ढवळे – 471
  10. गजराबाई सुदाम लबडे – 446
  11. करिष्मा रवींद्र रोही – 457
  12. संभाजी ज्ञानदेव कारंडे – 475
  13. संभाजी तानाजी सातपुते – 460

विजय झालेले उमेदवार खालील प्रमाणे

पिंपळखरे सेवा संस्थेच्या निवडणुकीमध्ये माजी उपसभापती अंकुशराव ढवळे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे